टॅरिफ वॉर ओसरले, सोन्याचे भाव घसरले; सोन्याच्या दरात मोठी घसरण

टॅरिफ वॉर ओसरले, सोन्याचे भाव घसरले; सोन्याच्या दरात मोठी घसरण

सध्याच्या बदललेल्या जागतिक वातावरणामुळो सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने टॅरिफबाबत संयमाची भूमिका घेतल्याने टॅरिफ वॉर निवळण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे जागतिक तणाव आणि अस्थिरता कमी होत असून सोन्यातील गुंतवणूकही कमी होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात असेच चढउतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. सोन्याचा दर त्याच्या विक्रमी उच्चांकावरून प्रति 10 ग्रॅम 6658 रुपयांनी घसरला आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेले टॅरिफ वॉर निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देश कधीही एकमेकांशी समझौता करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारापासून ते सराफा बाजार आणि एमसीएक्सपर्यंत सोन्याचे भाव दररोज कमी होत आहेत. वायदे बाजारात (एमसीएक्स) शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92,700 रुपये होती. ती 99,358 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकापेक्षा 6658 रुपये कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 3240.88 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, कॉमेक्स गोल्ड प्रति औंस 3257 रुपयांवर बंद झाला.

अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या थंडावण्यामुळे सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिका चीनवरील शुल्क कमी करू शकते. या संकेतानंतर डॉलर मजबूत होत आहे आणि सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, तरीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 92000 ते 94500 रुपयांच्या दरम्यान असू शकते. तसेच जागतिक परिस्थितीनुसार सोन्याच्या दरता चढउतार कायम राहू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सोन्याने 1 लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता सोन्याच्या किमतीत दररोज घसरण होत आहे. सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92650 रुपये आहे. तर मुंबईत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92,810 रुपये आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 93954 रुपये आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86062 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 70466 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याची किंमत 54963 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 1 किलो चांदीची किंमत 94125 रुपये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी
मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण...
“मंदिर खोदलं तर मशीद मिळेल, कुठपर्यंत खोदणार?”; प्रकाश राज यांनी मोदी सरकारला घेरलं
अबॉर्शन करण्यासाठी सर्वांनी…, लग्नाआधी गरोदर राहिलेल्या अभिनेत्रीचं दिग्गज क्रिकेटरसोबत अफेअर, पण…
शाहरुख खान त्याच्या मोकळ्या वेळेत घरी काय करतो? उत्तर जाणून वाटेल कौतुक
मी सती – सावित्री नाही, तारुण्यात सर्व काही…, गोविंदाच्या बायकोचा धक्कादायक खुलासा
कलिंगड खाताना चुकून बिया गिळल्या तर काय होते? जाणून घ्या
उन्हाळ्यात त्वचेची प्रत्येक समस्या दूर होईल, फक्त चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती टोनर