लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
लाडकी बहीण योजना जवळ जवळ बंद झाली आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच लांड्या लबाड्या करून त्यांनी या निवडणूका जिंकल्या आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजना जवळ जवळ बंद झाली आहे. आता लाडक्या बहीणींच्या खात्यात फक्त 500 रुपये येत आहेत. निवडणुकीच्या वेळी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती. अजित पवार म्हणतात की मी कर्जमाफीबद्दल बोललोच नव्हतो. अहो पण सरकार तुमचंच आहे ना. सरकारमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, आता प्रत्येक मंत्री म्हणतोय माझा पैसा, माझा पैसा. हा तुमचा पैसा कुठला. एका खात्याचा पैसा लाडकी बहीणसाठी वळवला. लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. मत पाहिजेत म्हणून तुम्ही हसत होतात. आता तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का? सरकारीच पैसा आहे. याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाच जे कार्य आहे त्याची फसवणूक करतंय. शेवटी सरकारन चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठीसाठी ही पाकीटमारी केली होती. आणि पाकीटमारी करणं सोपं नाही. अजित दादा तिथे बसलेले आहेत. अजित दादा एक खमके अर्थमंत्री म्हणून आमच्या काळात आम्ही पाहिलेल आहे असेही संजय राऊत म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता. त्यावर शिंदे गटाचे नेते आण मंत्री संजय शिरसाट हे चिडले होते. अर्थखात्यात शकुनी बसले आहेत असे विधान शिरसाट यांनी केले होते. त्यावर संजय राऊत म्हणालेकी, देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्याची तुम्ही जी लूटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं, दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही. अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहे त्यांच्याविषयी मी काही सांगण्याची गरज नाही असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List