आधी रडतानाचा व्हिडीओ पोस्ट, आता इरफान खानच्या मुलानं उचललं मोठं पाऊल; एका क्षणात…
दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बाबिल खान बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये बाबिल खान खूप रडताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, बाबिलने बॉलिवूडला सर्वात फेक म्हटलं आहे. हा व्हिडिओ बाबिल खानच्या वैयक्तिक इन्स्टा अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये त्याने अनेक सेलिब्रिटींची नावेही घेतली आहेत. त्यावरूनही बरीच चर्चा होत आहे.
बाबिलच्या रडण्याच्या व्हिडीओबद्दल कुटुंब आणि टीमचे निवेदन
पण आता याबतीत बाबिल खानच्या कुटुंबाने आणि त्याच्या टीमनेही एक निवेदन दिलं आहे. बाबिलच्या कुटुंबाकडून दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “गेल्या काही वर्षांत, बाबिल खानला त्याच्या कामाबद्दल आणि त्याच्या मानसिक आरोग्य प्रवासाबद्दल उघडपणे बोलल्याबद्दल खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे. इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे, बाबिलला कधीकधी कठीण दिवस येऊ शकतात. आणि हे त्यापैकीच एक होतं. आम्ही त्याच्या हितचिंतकांना कळवू इच्छितो की बाबिल खान सुरक्षित आहे आणि लवकरच तो यासगळ्यातून बाहेर येईल.”
अनन्या पांडे आणि अर्जुन कपूर सारख्या स्टार्सची नावे घेतल्यावर बाबिलच्या टीमने काय म्हटलं?
त्या विधानात बाबिलच्या व्हिडिओबद्दलही बोलले गेलं आहे. या व्हिडिओबद्दल त्यांनी असे म्हटले आहे की बाबिलला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे आणि त्याच्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. “त्या क्लिपमध्ये, बाबिल खान भारतीय चित्रपटसृष्टीच्या बदलत्या चेहऱ्यात सकारात्मक योगदान देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल बोलत होता. जसं की अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल , आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग यांसारख्या कलाकारांना त्यांनी त्याला सपोर्ट केला असं तो कौतुकाने सांगत होता.पण त्याने ज्या कारणासाठी त्यांची नावे घेतली होती ती नकारात्मक पद्धतीने नव्हती असंही त्याच्या टीमने सांगितलं आहे.
बाबिल खानच्या कुटुंबाने जारी केलेल्या या निवेदनात पुढे म्हटलं आहे की, “बाबिल खानच्या या व्हिडिओच्या आधारे निष्कर्ष काढण्याऐवजी, मीडिया आणि चाहत्यांनी बाबिल खानचे शब्द त्यांच्या संपूर्ण संदर्भात समजून घ्यावेत” असं आवाहन केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List