अनुराग कश्यपच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस; नेमकं काय आहे प्रकरण?

अनुराग कश्यपच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस; नेमकं काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मण समुदायाविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर चाणक्य सेनेनं शनिवारी त्यांच्याविरोधात एक घोषणा केली. कश्यप यांच्या चेहऱ्याला काळं फासणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा चाणक्य सेनेनं केली. अनुराग यांच्या कमेंटविरोधात शनिवारी अनेक ब्राह्मण संघटनांनी ऑनलाइन बैठक घेतली. यात चाणक्य सेनेसोबतच सर्व ब्राह्मण महासभा, ब्राह्मण सेवा संघ, अखिल भारतीय ब्राह्मण महासभा, विश्व ब्राह्मण परिषद आणि अखिर भारतीय ब्राह्मण संघ यांचा समावेश होता. सर्व ब्राह्मण महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि चाणक्य सेनेचे मुख्य संरक्षक पंडित सुरेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

अनुराग कश्यपसारख्या लोकांना धडा शिकवणं आवश्यक आहे, जे ब्राह्मणांबद्दल निराधार वक्तव्य करून समाजात फूट पाडत आहेत. ब्राह्मण समुदायाने या देशासाठी त्याग केले नाहीत का? सर्वांच्या कल्याणाबद्दल बोलणाऱ्या आणि देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या ब्राह्मणांवर अशा प्रकारच्या टिप्पण्या केल्या जात आहेत हे दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे”, अशा शब्दांत मिश्रा यांनी नाराजी बोलून दाखवली.

याविषयी मिश्रा पुढे म्हणाले, “समाजातील परस्पर आदर संपवण्याचे नापाक प्रयत्न करणाऱ्या समाजातील अशा विध्वंसक लोकांचा तीव्र विरोध झाला पाहिजे. सर्वजन हिताय आणि सर्वदजन सुखाय या भावनेनं काम करणाऱ्या ब्राह्ण समुदायाला लक्ष्य केल्याबद्दल अशा लोकांना अपमानित केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.”

मिश्रा हे भाजप सदस्य असून ते संस्कृती युवा संस्थेचेही संचालक आहेत. त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी जयपूर मॅरेथॉन आयोजित केली जाते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 2025 आणि 2024 मध्ये मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला होता. सलमान खान, अक्षय कुमार, रवीना टंडन, कंगना राणौत, मधुर भंडारकर, मंदिरा बेदी यांसारख्या सेलिब्रिटींनी मिश्रा यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. शनिवारच्या बैठकीत मिश्रा यांच्यासोबतच ब्राह्मण सेवा संघाचे विश्वंभर दयाल शर्मा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंभाचे के. एन. तिवारी, विश्व ब्राह्मण परिषदेचे डॉ. के. व्ही. शर्मा, ऑल इंडिया ब्राह्मण संघाचे प्रवीण मिश्रासुद्धा उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;