दाऊद इब्राहिम आणि प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘सिक्रेट’ मुलाबद्दल माहिती आहे? डॉनमुळे अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्थ
Dawood Ibrahim: एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशत होती. शिवाय अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींसोबत दाऊद इब्राहिम रिलेशलशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील अनेकदा रंगल्या. एवढंच नाही तर, एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दाऊद इब्राहिमच्या मुलाला जन्म दिल्याचं देखील अनेकदा सांगण्यात आलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली, एवढंच नाही तर, अभिनेत्रीचं करीयर देखील उद्ध्वस्त झालं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मंदाकिनी आहे.
सांगायचं झालं तर, 2015 मध्ये दिल्ली पोलिस आयुक्त असलेले नीरज वर्मा यांनी हा दावा केला होता. 2013 मध्ये निवृत्त नीरज शर्मा यांनी दाऊद इब्राहिमवर डायल डी फॉर डॉन नावाचे पुस्तक लिहिलं होतं. यामध्ये त्याने मंदाकिनी आणि दाऊदला एक गुप्त मुलगा असल्याचा देखील दावा केला होता.
नीरज कुमार यांनी असा दावाही केला होता की, त्यांनी दाऊद इब्राहिमची तीनदा मुलाखत घेतली होती. पुस्तकात त्यांनी दाऊद इब्राहिमच्या एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या प्रेमसंबंधाचाही उल्लेख केला होता. असाही दावा करण्यात आला होता की त्यांच्या मुलाला अभिनेत्रीची बहीण बेंगळुरूमध्ये सांभाळत आहे.
नीरज कुमार यांनी पुस्तकात कुठेही उल्लेख केलेला नाही की ती अभिनेत्री मंदाकिनी होती. पण हे मूल दाऊद इब्राहिम आणि 18 वर्षांच्या अभिनेत्रीचं आहे असा दावा निश्चितच करण्यात आला. दोघांनीही गुपचूप लग्न उरकलं होतं. 1994 मध्ये मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमचे फोटो व्हायरल झाल्यापासून त्यांच्या अफेअरच्या तुफान चर्चा रंगल्या. ज्यामुळे मंदाकिनीच्या बॉलिवूड करीयरवर देखील मोठा फटका बसला.
सांगायचं झालं तर, 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिमचं नाव पुढे आलं होतं. बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी होता, जो नंतर भारतातून पळून गेला. अशा परिस्थितीत, मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला.
दाऊद याच्यासोबत असलेल्या रिलेशनशिपबद्दल मंदाकिनी हिने मौन सोडलं होतं. 2010 मध्ये झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांनी माझं नाव दाऊदशी जोडावे किंवा त्याबद्दल आता विचार करावा असे मला वाटत नाही. ती आता भूतकाळातील गोष्ट आहे. त्या घटनेशी माझं नाव जोडून लोक अजूनही माझ्या नावाचा वापर करत आहेत. हे पाहून मला खूप वाईट वाटतं.
दरम्यान, बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्यानंतर मंदाकिनी हिची देखील चौकशी करण्यात आली. याप्रकरणी मंदाकिनी हिला क्लीन चिट तर मिळाली. पण अभिनेत्रीचं करीयर उद्ध्वस्त झाली. आता अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List