अक्किनेनी कुटुंबातील तो ‘अभिनेता’, 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न, 46 व्या वर्षी बहीण आहे अविवाहित!
अक्किनेनी कुटुंबात काही दिवसांपूर्वीच नव्या नवरीची एन्ट्री झाली आहे. साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याने सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केलं आहे. तर नागार्जुन यांचा दुसरा मुलगा निखिल देखील लग्न करणार आहे. याच दरम्यान, अक्किनेनी कुटुंबातून आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
ही आनंदाची बातमी साऊथ अभिनेता सुमंत कुमारशी संबंधित आहे. नागार्जुन यांचा भाचा सुमंतविषयी चर्चा आहे की तो दुसऱ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकू शकतो. सुमंत हा अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या मुलीचा मुलगा आहे.
मीडिया अहवालानुसार, सुमंत एका अभिनेत्रीला डेट करत आहे. असा दावा केला जात आहे की, दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. विशेष म्हणजे, सुमंत याची धाकटी बहीण सुप्रिया यार्लागड्डा हिचं वय 46 वर्षे आहे, पण तिचं अद्याप लग्न झालेलं नाही.
सुमंतबाबत असं म्हटलं जात आहे की, तो 50 व्या वर्षी दुसरं लग्न करू शकतो. मीडियामध्ये अशीही बातमी आहे की, दोन्ही कुटुंबांनी या नात्याला मान्यता दिली आहे. मात्र, या विषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
नागा चैतन्य यांचा चुलत भाऊ सुमंत याचं पहिलं लग्न 2004 मध्ये झालं होतं. त्याने कीर्ति रेड्डीशी लग्न केलं होतं. कीर्ति ही देखील एक अभिनेत्री आहे, जिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. मग तो महेश बाबूसोबतचा 'अर्जुन' असो वा पवन कल्याणचा 'थोली प्रेमा'. ती तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री राहिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List