माझ्या पर्मनंटसोबत डिनर डेट..; रिंकू राजगुरूच्या फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या डिनर डेटचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमुळे रिंकू आयुष्यातील खास व्यक्तीबाबत चर्चा होऊ लागली आहे.
'माझ्या 'पर्मनंट'सोबत डिनर डेट' असं कॅप्शन देत रिंकूने हा खास फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे रिंकूच्या आयुष्यातील ही 'पर्मनंट' व्यक्ती कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला. काहींनी तर आकाश ठोसरचंही नाव सुचवलं होतं.
जेवणाचं ताट, उकडीचे मोदक आणि स्वत:चा सुंदर फोटो पोस्ट केल्यानंतर अखेर रिंकूने तिच्या आयुष्यातील त्या 'पर्मनंट' व्यक्तीचा खुलासा केला. रिंकूने त्या व्यक्तीसोबतचा फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List