जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ

सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे ही आमचे नेते राहुल गांधी यांची आग्रही भूमिका होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. भाजपाचा याला विरोध होता पण उशिरा का होईना त्यांना जाग आली, त्याचे स्वागतच आहे. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाज घटकांना विकासात योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल. काँग्रेस पक्षाने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी यासाठी मोठा संघर्ष केला असून पुन्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव देशाला व सरकारला आला आहे. आता केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी पुढचे पाऊल टाकावे. समाजातील दलित, वंचित, मागास समाजापर्यंत विकासाचे फळ मिळाले पाहिजे. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी ओबीसी, मागास व दलित समाजातील स्वयंसेवकांनाही संधी कधी मिळेल याकडे आमचे लक्ष आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपा सरकारने मागील 11 वर्षात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. वर्षाला दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पट्रोल, डिझेल 40 रुपये लिटर करणार, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार ही आश्वासने चुनावी जुमले ठरले आहेत. हा निर्णय तसाच ठरू नये.

राहुल गांधी यांनी याआधीही जे मुद्दे मांडले त्याकडे अहंकारी तानाशाही सरकारने दुर्लक्ष केले होते पण नंतर राहुल झी गांधी यांची भूमिकाच योग्य होती असे स्पष्ट झाले आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने पुन्हा तेच सिद्ध झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी 400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी
मुंबईतील अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 400 शिक्षकांना मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शाळांमध्ये सामावून घ्या. अन्यथा...
दादर येथे आज एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ सोहळा, शिवसेना आणि जाणीव ट्रस्टच्या वतीने आयोजन
बलात्कारातील आरोपीच्या खात्यात शंभर कोटींचे व्यवहार!
Ratnagiri News – पाय मारला अन् डांबर निघालं; गुडघे गावाच्या हद्दीत सुरू असलेलं रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थ आक्रमक
उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ