वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई

वायफळ बडबड करणाऱ्या शाहिदी आफ्रिदीला हिंदुस्थानचा दणका, केली मोठी कारवाई

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22  एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने या घटनेत पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मागितले. तसेच त्याने या हल्ल्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला जबाबदार धरले. त्यानंतर आता हिंदुस्थान सरकारने शाहिद आफ्रिदीला दणका देत त्याच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया आली. या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी आफ्रिदीने भारतीय सैन्याला जबाबदार धरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मागितले आणि घटनेच्या मीडिया कव्हरेजवर टीका केली. एवढेच नाही तर, कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करणाऱ्या काही माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनाही आफ्रिदीने लक्ष्य केले होते. शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीवर बोलताना, हिंदुस्थानी सैन्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले होते. हिंदुस्थानविरुद्ध विष ओकण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाहीये. आफ्रिदीला संधी मिळते तेव्हा तो हिंदुस्थानविरोधी विधाने कायम करत असतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;