Mukesh Ambani: अंबानी कुटुंबातील Happy डॉगचा मृत्यू, व्हायरल होतेय भावूक पोस्ट
Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज हा भारतातील मोठा उद्योग समूह आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे मुकेश अंबानी यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. आता देखील सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये अंबानी कुटुंबातील Happy डॉगचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबानी कुटुंबाच्या सोशल मीडिया पेजवरून त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या निधनाची माहिती समोर आली आहे.
@ambani_update नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘Happy आता आपल्यात राहिलेला नाही…’ असं लिहिलं आहे. तर ‘तू कायम आमच्या आठवणीत राहशील…’ असं देखील लिहिण्यात आलं आहे.
शेअर करण्यात आलेले बहुतेक व्हिडिओ अंबानी कुटुंबाच्या भव्य समारंभाचे म्हणजेच अनंत अंबानी यांच्या लग्नाचे आहेत. या कार्यक्रमासाठी हॅपीसाठी एक वेगळा गोंडस ड्रेस देखील तयार करण्यात आला होता.
सोशल मीडिया पोस्टमध्ये असेही म्हटलं जात आहे की हा पाळीव कुत्रा अंबानी कुटुंबासाठी फार खास होता. संपूर्ण कुटुंबाला तो खूप आवडायचा आणि त्यांच्याशी खेळायचा. हा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्रा होता. वय झाल्यामुळे हॅपीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अंबानी कुटुंबातील Happy च्या निधनानंतर सोशल मीडियावर देखील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. अनेकांनी Happy चं वय किती होतं? असा प्रश्न विचारला आहे. तर अनेक प्राणीप्रेमी हॅपीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत. सध्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
सांगायचं झालं तर, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या साखरपुड्याची अंगठी देखील Happy खास अंदाजात घेवून आला होता. अनेकदा Happy ला अंबानी कुटुंबियांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List