पाकिस्तानची टरकली; आंतरराष्ट्रीय चौक्या केल्या रिकाम्या

पाकिस्तानची टरकली; आंतरराष्ट्रीय चौक्या केल्या रिकाम्या

पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर आज पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या. या चौक्यांवरील ध्वजही काढून टाकण्यात आले आहेत. हिंदुस्थानच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानची टरकल्याचे दिसत आहे. कठुआच्या पर्गल भागात या पोस्टस् होत्या त्या आता रिक्त करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानी सैन्य सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मात्र, आज पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. मात्र, त्यांच्या हल्ल्यांना हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

दुसरीकडे पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱया एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेला बैसरन खोऱयात 40 काडतुसे सापडली. फॉरेन्सिक टीमचे दोन सदस्यही एनआयएसोबत तपास करत आहेत. हे सदस्य स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने घनदाट जंगलात पुरावे गोळा करत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा 10 ते 12 राऊंड गोळय़ा झाडण्यात आल्या. आम्हाला आता या गोळीबाराची सवय झाली आहे, अशी प्रतिक्रिया अखनूरच्या पर्गवाल भागातील रहिवाशांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती, ‘जय जय स्वामी समर्थ’चा महारविवार विशेष भाग संचय धनाचा मोठा की पुण्याचा? उत्तर देणार स्वामींची चमत्कृती, ‘जय जय स्वामी समर्थ’चा महारविवार विशेष भाग
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 4 मे रोजी 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेचा महारविवार विशेष भाग पहायला मिळणार आहे. धनाने...
Raid 2 Review: कॉमन मॅनची पैसा वसूल कहाणी; अजय देवगणवर भारी पडला रितेश देशमुख
खऱ्या आयुष्यात कधी भ्रष्टाचाराचा अनुभव आला का? रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला..
उन्हाळ्यात पपई खावी की नाही? त्याचे फायदे – नुकसान जाणून घ्या
रात्रीच्या वेळेस आंबा खाताय? जरा थांबा तज्ज्ञांनी सांगितले यामागचे गंभीर कारण, जाणून घ्या
उन्हाळ्यात दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या
अभिनेत्री छाया कदम यांची वनविभागाकडून चौकशी; रानडूक्कर, साळिंदर आणि घोरपड सारखे प्राणी खाल्ल्याचा केला होता दावा