हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार

हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार

जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने  संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सरकारने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानींना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे एका सीआरपीएफ जवानाच्या पाकिस्तानी पत्नीलाही हिंदुस्थान सोडावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनीर खान असे या CRPF जवानाचे नाव असून मिलन खान असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. मुनीर खान हे जम्मू जिल्ह्यातील घरोट्याचे रहिवाशी आहेत. पहलगामच्या दहशवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आणि हिंदुस्थानातील सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर मिलन खान यांना जम्मूहून पाकिस्तानला परत पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सरकारने जारी केलेले हे आदेश मिलन खान यांना मान्य नव्हते. पाकिस्तानला जाण्याऐवजी हिंदुस्थानात राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आम्हाला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप लोकांच्या झालेल्या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कसे झाले लग्न-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन ही पाकिस्तानातील पंजाब प्रदेशाची रहिवासी आहे. ती पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरांवाला भागातील रहिवासी आहे. मुनीर आणि मिलन यांनी ऑनलाईन विवाह केला होता. 24 मे 2024 रोजी या जोडप्याचे लग्न झाले. व्हिसा न मिळाल्याने त्यांनी एक अनोखी पद्धत अवलंबली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;