कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील बुर्राबाजार येथील हॉटेल ऋतुराजमध्ये मंगळवारी आग लागली. या आगीमध्ये होरपळून 13 जणांचा मृत्यू झाला असून जीव वाचवण्यासाठी छतावरून उडी घेतलेल्या कर्मचाऱ्यानेही प्राण गमावले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे, तर अनेक जण आगीमध्ये भाजले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुर्राबाजार येथील मेचुआ फ्रुट मार्केट परिसरात असणाऱ्या हॉटेल ऋतुराजमध्ये मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांसह हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ सुरू झाली. यादरम्यान एका कर्मचाऱ्याने छतावरून खाली उडी घेतली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकाच्या सदस्यांनी हॉटेलमधील उर्वरित नागरिकांना वाचवण्यासाठी इमारतीत दाखल झाले. यावेळी हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यांमधून आगीत होरपळलेले 13 मृतदेह सापडले.

हॉटेलमधून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जणांना वाचवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच सदर घटनेची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कसाबला फाशीवर लटकवण्यात मोठा रोल; कोण आहेत देवेन भारती? कसाबला फाशीवर लटकवण्यात मोठा रोल; कोण आहेत देवेन भारती?
Mumbai Police Commissioner: वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे अतिरिक्त...
‘वडिलांनी मला धू धू धुतला असता..’; अशोक सराफ यांचा शाळेतील भन्नाट किस्सा
एजे-लीलाची जोडी हिट पण सीरिअल फ्लॉप; ‘नवरी मिळे हिटलरला’कडून चाहत्यांना धक्का
विक्की कौशल दर महिन्याला भरतो इतके लाख घरभाडे; तर 3 वर्षांचे इतके करोड
दहशतवाद्यांशी लढताना मुलाला आलेले वीरमरण, आता आईला जावं लागणार पाकिस्तानात
अपंग व्यक्तींसाठी eKYC प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश!
हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार