Health Tips- रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याचे आहेत खूप सारे फायदे! आजपासून तुम्हीही सुरुवात करा

Health Tips- रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याचे आहेत खूप सारे फायदे! आजपासून तुम्हीही सुरुवात करा

एका काळ होता त्यावेळी सुर्यास्तानंतर अन्नप्राशन करणे हे वर्ज्य समजलं जायचं. आज मात्र आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वेळा दोन्ही बदलल्या आहेत. खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरावर अतिशय विपरीत परीणाम होतात. आपल्याकडे म्हणूनच जेवणानंतर किमान काही काळ झोपू नये असे म्हटले जाते. म्हणूनच पूर्वीची जुनी-जाणती माणसं कायम म्हणायची, की शतपावली करा. काय असेल बरं या सर्वांमागचं कारण… जेवणानंतर शतपावली करण्याची प्रथा आता बंद पडल्यातच जमा आहे. अलीकडे आपल्या घरी जाण्या-येण्याच्या वेळाच बदलल्या आणि तिथेचे आपल्या सवयीही बदलल्या. म्हणूनच शतपावली म्हणजे काय असा अनेकांना प्रश्न पडतो. शतपावली म्हणजे जेवणानंतर काही काळ चालणे. त्यालाच शतपावली असे म्हणतात. म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान शतपावली म्हणजे शंभर पावले चालणे हे खूपच गरजेचे आहे.

 

काय होतात शतपावली करण्याचे फायदे

रात्री जेवण करुन झाल्यानंतर चालणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे जेवणामध्ये आणि आपल्या झोपेच्या वेळेमध्ये अंतर राहते. यामुळेच आपली पचनशक्ती सुधारण्यास खूप मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्यामुळे आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्येपासून आराम मिळतो.

 

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी, रात्री जेवणानंतर चालणे हे खूप गरजेचे आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे, आपले शरीर गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करण्यास सक्षम होते.

 

 

Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीजसाठी रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती!!!

 

मधुमेह असणाऱ्यांसाठी रात्री जेवणानंतर शतपावली करणे हे खूपच गरजेचे आहे. रात्री जेवून झाल्यानंतर, शतपावली केल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे मधुमेहग्रस्तांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

 

आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे हे खूपच गरजेचे आहे. शतपावली करण्यामुळे आपला मेटाबॉलिज्म तर वाढतोच. शिवाय मोठ्या प्रमाणात आपल्या कॅलरीजही बर्न होतात. अधिक कॅलरी बर्न झाल्यामुळे, आपले वजनही लवकर कमी होण्यास सुरुवात होते.

 

आपल्याला शरीराचे चयापचय वाढवायचे असेल तर, जेवणानंतर शतपावली करणे हे खूप गरजेचेआहे. शतपावली करण्यामुळे आपल्या शरीरातील एंडोर्फिन बाहेर पडून तणाव कमी होतो. त्यामुळे आपला मूडही सुधारण्यास खूप मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यामुळे आपला ताणही कमी होतो आणि मनावरील भारही हलका होतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!