पुणे घालणार पर्यटकांना साद

पुणे घालणार पर्यटकांना साद

सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा तयार करण्यात आला असून, तीन वर्षांत प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत पर्यटकांची संख्या एक कोटीच्या घरात नेण्याचा मानस आहे.

पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले, प्राचीन मंदिरे, लोककला, लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा, पर्यटनवाढीची अमर्याद संधीचा उपयोग करून पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा संकल्प आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये आराखड्याच्या प्राथमिक मसुद्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

राज्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांपैकी 79 टक्के पर्यटक मुंबईला भेट देतात, तर अवघे 14 टक्के पर्यटक पुण्याला येतात. पुणे जिल्हा पर्यटनविकास आराखड्याच्या यशस्वी आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीतून येत्या तीन वर्षांत जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 40 लाखांवर, तर पुढील पाच वर्षांत एक कोटीवर नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचा पर्यटनविकास आराखडा तयार करताना अन्य राज्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. गुजरातने कच्छच्या वाळवंटात ‘रणउत्सव’, अरुणाचल प्रदेशने झीरो व्हॅलीमध्ये ‘झीरो फेस्टिव्हल’, राजस्थानमध्ये जयपूरला ‘साहित्य महोत्सव’, नागालॅण्डमध्ये ‘हॉर्नविल महोत्सव’सारखे सुरू केलेले उपक्रम अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरले. पुणे जिल्ह्याचा पर्यटनविकास आराखडा राबविताना तो सर्वांच्या सहकायनि, मदतीने राबवावा. शक्य तेथे खासगी संस्था, संघटनांची मदत घेतली जाणार आहे.

काय आहे आराखड्यात?

  • जिल्ह्यातील मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडिंग स्पर्धा.
  • जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून जाणारी ‘ग्रॅण्ड सायकलिंग चॅलेंज’ स्पर्धा.
  • बारामती व इंदापूरला ‘हॉट एअर बलून फेस्टिव्हल’.
  • पवना धरणक्षेत्रात जलक्रीडाची व्यवस्था.
  • ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य घाटांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास.
  • जिल्ह्यातील कलावंतांच्या सहभागातून गायन, वादन, नाटक, साहित्य, काव्य, कथावाचनयांसारखे सांस्कृतिक महोत्सव.
  • पर्यटकांना पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद देण्याबरोबरंच साहसी खेळांचा प्रत्यक्ष अनुभव
  • देणाऱ्या ‘मोटरबोटिंग’, ‘झिपलाइन’ यांसारख्या साहसी खेळांची सुविधा.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात