प्रेम, वेदना…अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!

प्रेम, वेदना…अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे आणि आज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा उत्कृष्ट ट्रेलर आहे.

प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत तेव्हा…

ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा ट्रेलर आहे ज्यात सुदंर चित्रीकरण,उत्कृष्ट अभिनय, मधुर संगीत आणि इमोशन्स आपण पाहू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कथेबाबतची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. कथेमधील रहस्य आणि कहाणी नक्की कशी असणार आहे हे येत्या ९ मे ला समजेलच.


ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित 

‘माझी प्रारतना’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत.

चित्रपट 9 मे 2025 चित्रपटगृहात प्रदर्शित 

एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत “माझी प्रारतना” या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. “माझी प्रारतना” हा सिनेमा 9 मे 2025 पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;