Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर यावरून पडदा उठला असून आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत देवेन भारती?
देवेन भारती 1994 सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भारती यांनी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्व केले होते. त्यापूर्वी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) या पदावर कार्यकरत होते. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासह शहरातील अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातही त्यांचा सहभाग होता. महायुती सरकार आल्यानंतर विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली होती. देवेन भारती यांना मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता. आता विवेक फणसळकर निवृत्त झाल्यानंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List