Followers कमी झाले म्हणून इन्फ्लुएन्सरने उचललं टोकाचं पाऊल! बहिणीनेच सांगितलं सत्य
सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मिशा अग्रवाल असे तिचे नाव आहे. तिच्या 25 व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. याबाबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली होती. या घटनेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मिशाचा असा अचानक मृत्यू नक्की कशामुळे झाला? असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर आता मिशाच्या बहिणीनेंच मौन सौडले आहे.
मिशाचा मृत्यू 24 एप्रिल रोजी झाला होता. मात्र, 26 एप्रिल रोजी मिशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिच्या मृत्यूची बातमी देण्यात आली होती. यानंतर आता सहा दिवसांनी मिशाच्या बहिणीने मिशाच्या मृत्यूच्या मागचं कारण सांगितलं आहे. मिशाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या बहिणीने सांगितले. सोशल मीडियावर तिचे फोलोव्हर्स कमी होत होते. यामुळे माझ्या बहिणीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता, असे मिशाच्या बहिणीने सांगितले.
माझी लहान बहीण मिशा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असायची. तिने इन्स्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवतीत तिचे जग निर्माण केले होते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून तिला 1 मिलिअन फॉलोव्हर्सचा टप्पा पूर्ण करायचा होता. हेच तिचे ध्येय होते. जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले तेव्हा ती अस्वस्थ झाली होती. एप्रिलपासून ती खूप निराश होती. अनेकदा मला मिठी मारून रडायची. ‘जिज्जा, माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करू? माझं कारिअरचं संपेल असे तिने मला सांगितले होते.
मिशाने LLB ची डिग्री घेतली होती. तसेच ती स्पर्धा परिक्षेचीही तयारी करत होती. मात्र, सोशल मीडियाभोवती तिचे आयुष्य फिरत असल्याने तिला करिअरची चिंता भेडसावत होती. यासाठी तिला तिच्या बहिणीने धीर दिला होता. तू इन्स्टाग्रामकडे फक्त मनोरंजनाचे एक माध्यम म्हणूनच लक्ष दे आणि कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता स्वत:कडे लक्ष दे, असे मी तिला सांगितले होते. पण शेवटी तिने तिचे आयुष्य संपवले, असे तिच्या बहिणीने पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आता मिशाच्या आत्महत्येची बातमी वाचून तिच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List