मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठी बऱ्याच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची जोरदार चर्चा होत आहे. मात्र डार्क हॉर्स अधिकारी बाजी मारणार असे बोलले जात आहे.

सदानंद दाते, संजय वर्मा, संजीव सिंघल, अर्चना त्यागी, रितेश कुमार, प्रशांत बुरडे, आशुतोष डुंबरे, प्रभात कुमार व देवेन भारती या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. सद्यस्थितीत हे अधिकारी खात्यात वरिष्ठ असल्याने त्यांच्यापैकी एकाची आयुक्तपदी नियुक्ती होईल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. पण ज्यांच्या नावाची जास्त चर्चा होते त्यांना संधी मिळतेच असे नाही. मुंबई आयुक्तपदासाठी वरिष्ठ महासंचालक पदाचा अधिकारीच हवा असेही काही नाही. त्यामुळे सरकारची कृपादृष्टी ज्यांच्यावर आहे तोच अधिकारी आयुक्त पदावर बसतो. नावे अनेक अधिकाऱ्यांची चर्चेत असली तरी  डार्क हॉर्स अधिकारी यात बाजी मारणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

n सदानंद दाते हे सध्या एनआयएचे प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपास एनआयए करत आहे. तर अर्चना त्यागी, संजय वर्मा हे बराच कालावधी साईड पोस्टिंगला आहेत. रितेश कुमार होमगार्डचे महासंचालक असून यांना ज्युनियर असलेले आशुतोष डुंबरे हे ठाणे पोलीस आयुक्त, देवेन भारती सध्या मुंबईचे स्पेशल सीपी आहेत. तेव्हा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;