इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट झाले नव्हते. पण आता तिच्या घरच्यांनी याबद्दल खुलासा केला आहे. मीशा कॉमिक कंटेंट तयार करण्यासाठी ओळखली जात असे. तथापि, ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे कोणालाही माहिती नव्हते. मृत्यूची बातमी आल्यानंतर, सर्वत्र एकच प्रश्न उपस्थित झाला की हे अचानक कसं घडलं? आता मीशाच्या जीजू म्हणजे बहिणीच्या नवऱ्याने तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, युट्यूबर मीशा अग्रवालच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचा मृत्यू कसा झाला हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. आता मीशाच्या घरच्यांनी याबद्दल एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की की मीशा नैराश्याची शिकार होती आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला.
फॉलोअर्सची संख्या सतत कमी होऊ लागली म्हणून….
मीशाच्या घरच्यांनी मीशाच्या अकाउंटवर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मीशा इंस्टाग्राम आणि त्याच्या फॉलोअर्सना तिचे संपूर्ण जग मानत होती. तिचे एकमेव ध्येय होते की तिच्या फॉलोअर्सची संख्या लवकरात लवकर 10 लाखांपर्यंत वाढवी. काही दिवसांपूर्वी, मीशाने तिचे स्वप्न तुटताना पाहिले कारण तिच्या फॉलोअर्सची संख्या सतत कमी होऊ लागली, ज्यामुळे ती खूप निराश झाली होती.
करिअर संपेल अशी भीती
मीशाच्या घरच्यांनी पुढे सांगितले की आत्महत्या करण्यापूर्वी मीशाने खूप चिंतेत होती आणि ती खूप रडली होती. तिला वाटलं होतं की तिचं करिअर संपलं, मग ती काय करेल? त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी मीशाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की सोशल मीडिया आणि फॉलोअर्सचे जग कायमचे नाही आणि तिने याला जीवन मानू नये, तर तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, तिच्या एलएलबी पदवीवर आणि न्यायाधीश होण्याच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित करावं. वेळ घालवण्यासाठी इंस्टाग्राम वापरं”
इंस्टाग्रामने घेतला जीव
मीशाच्या नातेवाईकाने पुढे लिहिले की, ‘घरच्यांनी तिला समजावण्याचे अनेक प्रयत्न करूनही, मीशा तिच्या नैराश्यातून बाहेर पडू शकली नाही आणि तिने आत्महत्या केली. मीशाच्या जाण्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. हे नुकसान खूप मोठे आहे. मीशा तिच्या फॉलोअर्सना कुटुंबासारखे मानत होती, पण तिचे फॉलोअर्स झपाट्याने कमी होत आहेत हे तिला सहन होत नव्हते. या परिस्थितीसमोर पराभूत होऊन, तिने मृत्यूला कवटाळले. मीशाच्या चाहत्यांना नक्कीच दु:ख वाटतं असेल की त्यांना पुन्हा कधीही असा हसरा चेहरा पाहता येणार नाही”, पोस्टमध्ये परिस्थितीची खुलासा करत तिच्या नातेवाईकांनी सगळंच सांगितलं आहे. दरम्यान मीशाच्या घरच्यांनी केलेल्या या पोस्टवर चाहतेही सतत कमेंट्स करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List