मुंबई हल्ल्याशी जोडलं गेलं होतं आलिया भट्टच्या भावाचं नाव; 7 वेळा झालीये अटक
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा आणि अभिनेत्री आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहुल भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याच मुलाखतीत राहुल भट्टने मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी त्याचं नाव जोडल्याप्रकरणी आणि आपली प्रतिमा मलिन झाल्याप्रकरणीही भाष्य केलंय. राहुलने या घटनेला त्याच्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ आणि ट्रॉमा म्हटलंय.
राहुल भट्ट 2009 मध्ये चर्चेत आला होता, जेव्हा त्याच्याबद्दल म्हटलं गेलं होतं की त्याने नकळत डेविड हेडलशी मैत्री केली. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपींपैकी एक डेविड होता.
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत राहुलने सांगितलं की याप्रकरणामुळे केवळ त्याची प्रतिमा मलिन झाली नाही तर त्याने स्वत:चं अस्तित्त्वही गमावलं होतं. इतकंच नव्हे तर सात वेळा अटक झाल्याचाही खुलासा राहुलने या मुलाखतीत केला.
मी जरी माझ्या भावनिक संघर्षाला दाखवत नसलो तरी माझ्यावर त्या गोष्टींचा खूप परिणाम झाला आहे. मी सर्वात जास्त सहन केलंय. माझ्या ओळखीवर, अस्तित्वावर चिखलफेक झाली. माझ्या चारित्र्यावर लांछन लागले. कशासाठी? मी काहीच केलं नव्हतं. जर मी काही चुकीचं केलं असेन तर माझ्यात इतकी हिंमत आहे की मी माझा गुन्हा कबुल करेन", असं तो म्हणाला.
माझ्यात गोष्टींना सामोरं जायची हिंमत होती. परंतु मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. तरीसुद्धा मला खूप काही सहन करावं लागलं होतं. आजसुद्धा मला सगळं आठवतंय. दु:ख या गोष्टीचं होतं जेव्हा लोक तुम्हाला गद्दार म्हणतात आणि तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नसतं. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं बंद करता", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List