Pune crime news – नकली पिस्तूल दाखवून ज्वेलर्स शॉप लुटले, 20 ते 25 तोळ्यांचे दागिने लांबविले

Pune crime news – नकली पिस्तूल दाखवून ज्वेलर्स शॉप लुटले, 20 ते 25 तोळ्यांचे दागिने लांबविले

सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये शिरून तिघाजणांनी नकली पिस्तुलाच्या धाकाने 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी भरदुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास धायरीतील श्री ज्वेलर्स शॉपमध्ये घडली आहे. चोरट्यांनी ज्वेलर्स मालकालाही मारहाण केली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विष्णू सखाराम दहिवाल यांचे धायरीतील रायकरमळा परिसरात श्री ज्वेलर्स शॉप आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दहिवाल आणि त्यांच्या दुकानातील कामगार शॉपमध्ये होते. त्यावेळी चोरट्यांपैकी एकाने ज्वेलर्समध्ये शिरून सोन्याची चैन दाखवा, असे म्हणत दागिने खरेदीचा बहाणा केला. त्यानुसार दुकानमालक दहिवाल हे त्याला सोन्याची चैन दाखवत असताना, दोघा चोरट्यांनी शॉपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिघांनी मिळून ज्वेलर्स मालक दहिवाल यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकी दिली. शिवीगाळ करीत 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले.

दहिवालने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांना मारहाण करून चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा भरदिवसा धायरीतील घटनेने थरार माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरट्यांपैकी एकजण 35 वर्षांचा असून त्याच्या अंगात लाल रंगाचे हाफ टी-शर्ट, निळी जीन्स पॅन्ट आहे.

दुसरा चोरटा अंदाजे 25 वयाचा असून, फुल काळा टी-शर्ट गोल गळ्याचा, डोक्यामध्ये काळ्या रंगाची टोपी, तोंडावर मास लावलेला, काळ्या रंगाची पॅन्ट असा “चोरीच्या उद्देशाने शॉपमध्ये शिरलेल्या तिघांनी नकली पिस्तुलाच्या धाकाने दुकानमालकाला धमकावून लूट केली आहे. त्यांना मारहाण करीत चोरटे दुचाकीवरून पसार झाले आहेत. आरोपींच्या शोधार्थ पोलीस मागावर आहेत.

“वेश परिधान केला आहे. तिसऱ्या चोरट्याचे अंदाजे वय 25 असून, त्याने क्रीम रंगाचा फुल बायाचा गोल गळ्याचा टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पांढरे शूज पाठीवरती बॅग आहे. माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी धाव घेतली. प्राथमिक तपासात चोरट्यांनी वापरलेले पिस्तूल नकली असल्याचे दिसून आले आहे.”

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;