प्रेमासाठी तिने करिअर सोडलं, पतीसाठी विकली 100 कोटींची मालमत्ता; बॉलिवूड ते साऊथपर्यंत भुरळ पाडणारी अभिनेत्री कोण?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक हिट नायिका झाल्या आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्याने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं आहे. तसेच आपल्या अभिनयाने खूप प्रसिद्धी मिळवली. अशीच एक अभिनेत्री आहे जिने तिच्या निरागस सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडमध्ये 90 च्या दशकात तर तिने अनेक हिट चित्रपट दिले.एवढंच नाही तर तिने साऊथमध्येही आपली जादू दाखवली. पण लग्नानंतर तिने या ग्लॅमर जगाला निरोप दिला.
पतीसाठी तिची 100 कोटींची मालमत्ता विकली
या नायिकेने तिच्या पतीसाठी तिची 100 कोटी रुपयांची मालमत्ताही विकली. पण आता गेल्या काही वर्षांपासून ती पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात आपली ओळख शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे मधु शाह. अजय देवगण आणि मधूचा ‘फूल और कांटे’ हा चित्रपट आणि यातील गाणे आजही हिट आहेत.
हेमा मालिनीसोबत आहेत खास कनेक्शन
मधु शाह एका फिल्मी वातावरण असलेल्या कुटुंबातून आली आहे. तिचे वडील रघुनाथ शाह हे माजी बॉलिवूड सुपरस्टार हेमा मालिनी यांचे काका होते. मधुच्या आईने तिला लहानपणापासूनच भरतनाट्यमचे प्रशिक्षण दिले. मधुनेही हेमा मालिनी यांच्यासारखी अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला आणि त्यापद्धतीने तिने मेहनतही घेतली होती.
हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये सुपरहीट चित्रपट दिले
मधुने 1990 मध्ये मल्याळम चित्रपट ‘ओट्टयाल पट्टलम’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, 19991 मध्ये तिने अजय देवगणसोबत ‘फूल और कांटे’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आणि अजय देवगणसोबत मधु देखील बॉलिवूड स्टार बनली. सुमारे 5 वर्षांत, मधुने हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये 30 हून अधिक चित्रपट केले. ‘फूल और कांटे’, ‘दिलजले’, ‘यशवंत’ आणि ‘पहाचान’ यासारख्या काही बॉलिवूड चित्रपटांनी मधुला लोकप्रियता दिली आणि तिला बॉक्स ऑफिसवरही यश मिळवून दिले.
लग्नानंतर चित्रपटसृष्टीला निरोप
जरी तिची कारकीर्द शिखरावर होती, तरीही मधुने तिच्या कुटुंबासाठी तिचे फिल्मी करिअर सोडण्याचा प्रयत्न केला आणि 1999 मध्ये लग्नानंतर चित्रपटसृष्टीला निरोप दिला. मधु काही वर्षे तिच्या पतीसोबत अमेरिकेत राहिली आणि त्यांना दोन मुलीही झाल्या. लग्नाच्या काही वर्षांनंतर, मधूचा पती, जो एक व्यापारी आहे, त्याचे खूप मोठे नुकसान झाले होते. व्यवसायात तोटा झाल्यामुळे मधुचा नवरा कर्जात बुडाला तेव्हा मधुने तिची 100 कोटी रुपयांची मालमत्ता विकून तिच्या पतीला मदत केली. तथापि, नंतर मधूच्या पतीनेही ही मालमत्ता परत मिळवली.
मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा फिल्मी करिअरची सुरुवात
पण आता या मोठ्या ब्रेकनंतर मधु पुन्हा एकदा अभिनयाच्या जगात परतली आहे आणि आता ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसते. मधु लवकरच ‘कनप्पा’ या साऊथ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मधु एक खास भूमिका साकारणार आहे. मोहनलाल, प्रभास, विष्णू मंचू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे बजेट 200 कोटींपेक्षा जास्त आहे. हा चित्रपट दक्षिणेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. या चित्रपटात मधुने पन्नगाची भूमिकाही साकारली आहे. आता मधू या चित्रपटाच्या माध्यमातून पु्न्हा प्रेक्षकांची मने जिंकून घेते का हे पाहणे महत्वाचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List