नागरिकांनो सावधान! पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी अधिकारी भासवून करतेय फोन, वाचा सविस्तर माहिती
हिंदुस्थानी आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. मात्र अजूनही पाकड्यांच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. आता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (PIO) हिंदुस्थानी व्हॉट्सअॅप नंबरचा गैरवापर करून लोकांना दिशाभूल करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (PIO) हिंदुस्थानी संरक्षण अधिकारी असल्याचे भासवून पत्रकार आणि नागरिकांना फोन करण्यासाठी 7340921702 या हिंदुस्थानी व्हॉट्सअॅप नंबरचा वापर करत आहेत.
ऑपरेशन सिंदूर सुरु असताना सद्य परिस्थितीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी पत्रकारांना आणि नागरिकांना फोन करत आहे. यामुळे हिंदुस्थानी नागरिकांना आणि पत्रकारांना अशी कोणतीही माहिती शेअर करू नका, असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List