शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख; पण नक्की कारण काय?
सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या चित्रपटामुळे, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता शाहरूख खानचे प्रोडक्शन हाऊस चर्चेत आलं आहे. शाहरूख खानचं प्रॉडक्शन हाऊस एका मुलीच्या घरच्यांना चक्क 62 लाखांची भरपाई देणार आहे. मुंबई हायकोर्टानेच तसा निकाल दिला आहे. पण का? नक्की काय कारण आहे?
शाहरुख खानचं प्रॉडक्शन या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख
शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ज्या मुलीला पैसे देणार आहे ती प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणारी कर्मचारी चारू खंडाल आहे. जिचा बऱ्याच वर्षांपूर्वी हिट-अँड-रनमध्ये मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वी एका वेगवान कार अपघातात तिचे निधन झाले.तेव्हा चारू खंडाल फक्त 28 वर्षांच्या होत्या. त्याची भरपाई म्हणून शाहरुखच्या कंपनीतील त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 62 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता.
न्यायालयाचा निर्णय काय?
9 मे रोजी, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सांगितले की नोव्हेंबर २०२० मध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशात कोणतीही अनियमितता आढळली नाही आणि तो रद्द करण्यास नकार दिला. मोटार वाहन कायदा हा फायदेशीर कायदा आहे, असे खंडपीठाने म्हटले. कलम 21 अंतर्गत नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. ज्यामध्ये सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार समाविष्ट आहे.
पैसा आयुष्याची जागा घेऊ शकत नाही
या प्रकरणात, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचं उदाहरण देत म्हटलं आहे की, पैशाने जीवितहानी भरून काढता येत नाही. अशा परिस्थितीत, योग्य भरपाई देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून पैसे नुकसान भरून काढण्यास थोडी मदत करू शकतील.
चारू खंडालची केस काय होती?
न्यायालयाने सुनावणीत पुढे म्हटले की, ‘योग्य भरपाई मिळणे कठीण आहे, परंतु योग्य भरपाई हा आदर्श असला पाहिजे.’ न्यायालयाने म्हटले की, मृताच्या कुटुंबाला न्यायाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी किमान एवढे तरी करता येईल. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या अॅनिमेटर चारू खंडाल यांच्या कुटुंबाला 62 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 2017 मध्ये, शाहरुख खानच्या ‘रावन’ चित्रपटात व्हीएफएक्सवर चारू खंडालने काम केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List