VIDEO: ‘किती भाग्यवान आहेत कामगार..’ शाहरुख खानच्या 200 कोटींच्या ‘मन्नत’चे रिनोव्हेशन; बंगल्याचा लूक बदलणार?
शाहरुख खान हा सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. रोमान्स किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शाहरूखची जेवढी क्रेझ आहे तेवढीच त्याच्या घराची क्रेझही चाहत्यांच्या मनात आहे. शाहरूखचे घर ‘मन्नत’ चाहत्यांच्या तेवढंच जवळच आहे. जे चाहते शाहरूखला पाहण्यासाठी येतात ते मन्नतजवळ येऊन फोटो काढणार नाही असं होतच नाही. पण सध्या मन्नतच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. हे काम सुर झालं असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मन्नतच्या रिनोव्हेशनचं काम सुरू
या व्हिडीओमध्ये मन्नतच्या वरच्या मजल्यावर काम करणारे कामगार दिसत आहेत. ते काम करण्यापूर्वी दोरी आणि आवश्यक वस्तू पॅक करताना दिसत आहेत. रिनोव्हेशनचं काम सुरु असल्याने संपूर्ण घर रिकामं आहे. शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब मन्नतमधून आता दुसरीकडे शिफ्ट झाले आहेत. शाहरुख खान, गौरी आणि मुलांसह बांद्राच्या पॉश पाली हिल परिसरातील एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहायला गेला आहे. तो सध्या तिथेच शिफ्ट झाला आहे. तसेच मन्नतच्या रिनोव्हेशनचं काम पूर्ण व्हायला किमान 2 वर्ष लागतील असंही म्हटंल जात आहे.
“किती भाग्यवान आहेत कामगार ज्यांना शाहरुखचं घर बांधण्याची संधी मिळाली”
या व्हायरल व्हिडिओवर चाहते मात्र मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “किती भाग्यवान आहेत हे कामगार मित्र, ज्यांना शाहरुखचं घर बांधण्याची संधी मिळाली”, तर एकाने म्हटले “जर तुम्हाला मजुरांची गरज असेल तर मी तयार आहे”, एका युजरने म्हटले “कामगारही म्हणतील, ‘मी शाहरुखचे घर बांधले आहे.”
मन्नतचा लूक बदलणार?
त्यामुळे आता रिनोव्हेशन झाल्यानंतर मन्नतचा लूक बदलणार का याचीही चर्चा चाहत्यांमध्ये आहे. तसचे रिनोव्हेशननंतर मन्नतचं सौंदर्य वाढणार असल्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये आहे.दरम्यान शाहरूख खान आपल्या कुटुंबासोबत ज्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला आहे ती वाशु भगनानी यांची प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं जात आहे. शाहरुखने अख्खा फ्लोअरच भाड्याने घेतल्याचं म्हटलं जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List