‘तिचे खूप उपकार आहेत…’ नाना पाटेकरांनी घटस्फोट न घेता पत्नीपासून वेगळं राहण्याचं कारण स्पष्टच सांगितलं
बॉलिवूड, साउथ आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख बनवणारे अभिनेते म्हणते नाना पाटेकर. नाना पाटेकर यांना कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. त्यांनी आतापर्यंत केलेले चित्रपट, त्यांचा अभिनय सर्वच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं आहे. असे हरहुन्नरी कलाकार असलेले नाना चित्रपट, अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिले आहेत.
नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘गमन’ या चित्रपटातून केली होती पण ‘परिंदा’ या चित्रपटात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे ते स्टार बनले. नानांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांचे मन जिंकले. त्याच वेळी, अभिनेत्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले. नानांनी नीलू उर्फ निलकांती यांच्याशी लग्न केलं. नीलकांती अभिनेत्री होत्या, तसेच बँकेत अधिकारी होत्या. त्यांनी नुकत्याच आलेल्या ‘छावा’ चित्रपटातही झळकल्या.
निलकांती आणि नाना यांची पहिली भेट
निलकांती आणि नाना यांची भेट थिएटरमध्येच झाली. त्यावेळी नाना महिन्याला 15 थिएटर शो करायचे आणि प्रत्येक शोसाठी त्यांना 50 रुपये मिळत होते ज्यामुळे ते महिन्याला 750 रुपये कमवत असत. तर त्यांची पत्नी महिन्याला 2500 रुपये कमवत असे. निलकांती नानांच्या इतक्या प्रेमात होत्या की त्यांना या सर्व गोष्टींचा कधीही फरक पडला नाही. अखेर नाना व निलकांती यांनी प्रेमविवाह केला. नानांशी लग्न केल्यानंतर निलकांती सचिन पिळगावकर यांनी बनवलेला ‘आत्मनिर्भर’ हा मराठी चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता पण नंतर त्या चित्रपटांपासून दूर झाल्या.
“माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत…”
नानांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे ते जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा त्यांनी पूर्णत: त्यात स्वत:ला झोकून दिलं होतं. त्यासाठी त्यांना निलकांती यांनी पाठिंबा दिला. नानांनी सांगितंल की,”तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही हे त्यावेळी माहीत नव्हतं. पण तिने विश्वास ठेवला.”
कुटुंबापासून वेगळा राहण्याचा निर्णय का?
तसेच कुटुंबापासून वेगळं राहण्याचं कारण सांगताना नाना म्हणाले, ” मल्हार (मुलगा) होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा राहायचो, ते एकत्र राहायचे. आई, मल्हार व निलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच वेगळा राहत होतो,”
नाना पाटेकरांचे अभिनेत्रींशी जोडले होते नाव
एवढंच नाही तर नाना जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा ‘खामोशी द म्युझिकल’ चित्रपटादरम्यान, नानांचं नाव हे अभिनेत्री मनीषा कोइरालासोबत जोडल गेले. मनीषा नानापेक्षा 21 वर्षांनी लहान होती, पण त्याचाही विचार न करता नाना मनीषाबद्दल खूप गंभीर होते असंही म्हटलं जातं. मनीषा देखील नानाशी लग्न करू इच्छित होती पण नाना त्यांची पत्नी नीलूशी घटस्फोट घेण्यास तयार नव्हते. जेव्हा त्यांच्या पत्नीला नाना आणि मनीषाच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा त्या अखेर घराबाहेर पडल्या अशी चर्चा तेव्हाही झाली होती आणि आजही असचं म्हटलं जातं.
मनिषानंतर 2003 मध्ये नाना पाटेकरांचे नाव आयेशा झुल्कासोबत जोडले गेले. आयेशा नानांपेक्षा 24 वर्षांनी लहान होती पण चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील जवळीक इतकी वाढली की ते एकत्र राहू लागले. नाना मनीषासोबत राहत असताना, तो आयेशाला देखील डेट करत असल्याचं म्हटलं जातं. एके दिवशी मनीषाने नाना आणि आयेशा यांना एका खोलीत एकत्र पाहिलं आणि त्यानंतर त्या दिवसानंतर ती मनिषा नानापासून वेगळी झाली. पण नानांच्या पत्नीला नानांबद्दल सर्व काही माहित असतानाही. त्यांनी घटस्फोट दिला नाही. पण आजही ही जोडी वेगळी राहते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List