आलिया भट्टच्या मोठ्या बहिणीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो; आलियानेही केली कमेंट
आलिया भट्टची बहीण शाहीन भट्टचे फोटो अनेकदा पाहतो. तिचे आणि आलियाचे बॉंडींग तर सर्वांना माहित आहे. पण खरंतर शाहीनला तिचं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. शाहीन भट्ट लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. पण तिच्या एका पोस्टमुळे इंटरनेटवर चर्चा होताना दिसत आहे. नुकताच तिने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या व्यक्तीला अगदी प्रेमाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरून शाहीन भट्ट त्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
आलियाची मोठी बहिण कोणाला करतेय डेट?
हा व्यक्तीचे नाव ईशान मेहरा आहे. जो फिटनेस प्रशिक्षक आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त शाहीनने काही गोंडस फोटो पोस्ट केले आहे. या खास पोस्टवर आलियानेही कमेंट केली आहे. आलियासोबतच अनन्या पांडे, नीतू कपूर आणि इतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमुळे शाहीन भट्ट आणि ईशान मेहरा एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. या तिन्ही फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात असलेले दिसले आहेत.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत केली नात्याची घोषणा
शाहीन भट्टने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती ईशानच्या खांद्यावर चेहरा ठेवून हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये फक्त ईशान आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्रीने तिचा आणि ईशानच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत शाहीनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सनशाइन’. आलिया भट्टने देखील त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
आलियाचीही फोटोंवर कमेंट
आलिया भट्ट तिची बहिणी शाहीनसाठी खूप आनंदी दिसतं आहे. आलियाने तिच्या इंस्टा स्टोरीवर शाहीनची पोस्ट शेअर केली आणि ईशानलाही टॅग केलं आहे आणि त्याला शुभेच्छा देताना लिहिलं आहे की,” आमच्या आवडत्या जोडीदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” याशिवाय शाहीनच्या या पोस्टवर इतर लोकांच्या प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत. पूजा भट्टने हार्ट इमोजी शेअर केल्या केल्या आहेत. तर नीतू कपूर यांनीही शुभेच्छा देत लिहिलं आहे, ” माझ्याकडूनही त्याला टाइट हग करून शुभेच्छा द्या” याशिवाय मसाबा गुप्ता, परिणीती चोप्रा, अनन्या पांडे, अर्जुन कपूर आणि बादशाह या कलाकारांनीही शाहीनचे अभिनंदन केले आहे.
शाहीन भट्टबद्दल बोलायचे झालं तर ती आलिया भट्टची सख्खी मोठी बहीण आहे. ती सोनी राजदान यांची मुलगी आहे. तिच्या कुटुंबाप्रमाणे, शाहीनने अभिनयात करिअर निवडलं नाही. ती मेंटल हेल्थ अॅडवोकेट आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List