‘कोणी बाळ जन्माला घालण्यासाठी सापडलं तर…’, रेखा यांचं मोठं वक्तव्य

‘कोणी बाळ जन्माला घालण्यासाठी सापडलं तर…’, रेखा यांचं मोठं वक्तव्य

‘सिलसिला’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘खिलाडियो का खिलाडी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ”दिल है तुम्हारा’, ‘सुपर नानी’, ‘बीवी हो तो ऐसी’. ‘नागिन’, ‘मिस्टर नटवरलाल’ अशा अनेक सिनेमांमध्ये रेखा यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चहात्यांचा मनोरंजन केलं. आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. रेखा आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील एकट्याच आयुष्य जगत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी वैवाहिक आयुष्य आणि मुलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना रेखा यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं काहीनाही, बॉलीवूडमध्ये काम करत असताना रेखा यांचं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणासोबतही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. महानायक अभिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या रिलेशनशिपच्या आजही रंगलेल्या असतात.

अखेर 1990 मध्ये रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. मुकेश यांनी लग्नाच्या सात महिन्यानंतर स्वतःला संपवलं त्यानंतर रेखा यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचे एन्ट्री कधी झालीच नाही. पतीच्या निधनानंतर रेखा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

रेखा यांनी त्यांच्या जोडीदाराबद्दल एक इच्छा व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, ‘मी लग्नासाठी नकार देत नाहीये, पण मला माझ्या इच्छा पूर्ण करणारा जोडीदार हवा आहे. जो मला माझा स्वतःचा वेळ देईल. मी देखील पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी तयार आहे. मी त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवेल, मी त्याची काळजी घेईल, त्याचे कपडे धुवेल, मी हे सर्व काही मोठ्या आनंदाने करेल. पण त्याने देखील माझ्या भावनांचा विचार करायला हवा..’

एवढंच नाही तर आई होण्याच्या इच्छेवर देखील रेखा यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘रेखा म्हणाल्या होत्या मला आई व्हायचं नाहीये आणि याबद्दल माझी काही खंत नाहीये. जर मला एखादा असा व्यक्ती भेटला ज्याला माझ्याकडून मुलांची अपेक्षा नाहीये मी अशा व्यक्तीसोबत लग्न करेल. कारण मूल झाल्यानंतर मी माझ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. माझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल.’ सध्या सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात