‘छावा’ने कमालच केली बुवा! ‘हा’ नवा विक्रम पाहून तुम्हीही व्हाल खुश!
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला.
विकी कौशलचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट 11 एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊनही थिएटरमध्ये दहाव्या आठवड्यातही तो थिएटरमध्ये कमाई करत आहे. या चित्रपटाने आजवर बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
आता हा चित्रपट भारतात 600 कोटी रुपयांची कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानचा 'जवान' आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हे चित्रपट या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.
'छावा'ने गेल्या 64 दिवसांत भारतात 601.1 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यापैकी 585.23 कोटी रुपयांची कमाई ही हिंदी भाषेतील असून तेलुगू भाषेत या चित्रपटाने 15.87 कोटी रुपये कमावले आहेत. तर शाहरुखच्या 'जवान'ने भारतात 640.25 कोटी रुपये आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ने 627.02 कोटी रुपयांची कमाई केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List