पाण्यासाठी घोडबंदरमधील आदिवासींचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या झळा…

पाण्यासाठी घोडबंदरमधील आदिवासींचा हंडा मोर्चा, पाणीटंचाईच्या झळा…

कशासाठी… पाण्यासाठी, आश्वासन नको पाणी द्या, अशा घोषणा देत आज ठाण्याच्या घोडबंदर पट्ट्यातील असंख्य आदिवासी बांधवांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीवर हंडा मोर्चा काढला. ठाण्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने आदिवासी महिलांनी डोक्यावर रिकामे मडके आणि हंडे घेऊन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

माजिवडा येथील आदिवासी वस्ती-पाड्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी व्हावी याकरिता सातत्याने लेखी निवेदन देऊन आणि पाठपुरावा करूनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीबाहेर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आदिवासी बांधवांच्या वतीने पाणी समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. भरउन्हात आदिवासी महिलांनी मोर्चात सहभाग घेतला होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी येथे ठिय्या मांडला होता. मागील कित्येक वर्षांपासून घोडबंदर भागातील पानखंडा, बाबनोली पाडा आदींसह इतर 13 आदिवासी पाड्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. वनविभागाच्या हद्दीत येथील पाडे असल्याने त्यांना पाणी देता येत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • या प्रमुख मागण्या
  • प्रत्येक कुटुंबाला त्याच्या राहत्या घरात पाणी नळजोडणी तातडीने मंजूर करून पाणीटंचाईमुक्त गावपाडे करण्याचा ठराव करावा.
  • जागेचा अडथळा निर्माण होत असलेल्या ठिकाणी बोअरवेल मारून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
    सुरू असलेल्या पाइपलाइनला वाढीव नळजोडणी करण्यात येऊ नये.
  • ज्या भागात जलवाहिन्या लहान आहेत त्यांची क्षमता वाढवावी.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले… सुप्रियाची सासरी पाठवणूक करताना भास्कररावांच्या गालांवर नकळत अश्रु ओघळले…
शिवसेनेची कोकणातील मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे भास्करराव जाधव हे विरोधकांना नेहमीच पुरुन उरतात. त्यांच्यातील लढवय्या नेता नेहमीच दोन...
WAVES 2025 : चॅटजीपीटीवरून कुकने लिहिली ‘मिस्टर इंडिया 2’ ची स्क्रिप्ट; शेखर कपूर यांचा मोठा दावा
Bathing tips: कितीही रगडून अंग घासा, शरीरातील ‘हे’ तीन भाग तरीही राहतात अस्वच्छ, एका ठिकाणी तर…
अटारी सीमेवर पाकिस्तानचा खोडसाळपणा, गेट न उघडल्याने दोन्ही बाजूंनी लोक अडकले
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
बाजारातील आले हे बनावट आहे कसं ओळखाल?
पहलगाम हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील लोक सर्वाधिक त्रस्त – फारुख अब्दुल्ला