अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा, पत्नी शुरा प्रेग्नंट? नेमकं काय आहे सत्य?

अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा, पत्नी शुरा प्रेग्नंट? नेमकं काय आहे सत्य?

अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खान यांना मंगळवारी मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर पाहिलं गेलं. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट केला आणि नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला. अरबाज-शुराचा हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावेळी अरबाजच्या हातात मेडिकल हिस्ट्रीची फाइल होती आणि शुराने ढगळे कपडे परिधान केले होते. त्यामुळे ती प्रेग्नंट असून बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. अरबाज लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु यामागचं सत्य काहीतरी वेगळंच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज आणि शुरा हे मॅटर्निटी क्लिनिकला गेले नव्हते. तर ते डॉ. राकेश सिन्हा यांच्या वुमन हॉस्पिटल, फायब्रॉइड क्लिनिकला गेले होते. डॉ. राकेश सिन्हा आणि डॉ. मंजू सिन्हा यांना फायब्रॉइड आणि युटेरस रिमूव्हलमधील त्यांच्या वैशिष्ट्यांसाठी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळाले आहेत. परंतु अरबाज आणि शुराच्या रुग्णालयाला जाण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चाहत्यांना इतक्यात काही गुड न्यूज मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

अरबाज आणि शुराने डिसेंबर 2023 मध्ये निकाह केला होता. बहीण अर्पिता खानच्या घरातच हा निकाह पार पडला होता. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे. अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे.

लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे, याविषयी अरबाजला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “मी खूप खुश आहे. पत्नीला ओळखू लागल्यापासून मी बराच शांत आणि एकाग्र झालोय. शुराला डेट करत असल्यापासून आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि हा बदल सकारात्मकच होता.” शुराला भेटल्यापासून मी स्वत:विषयी अधिक आत्मविश्वासू झालोय, असंही अरबाज या मुलाखतीत म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“आमच्या वेदनेची थट्टा करताय..”; पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या अतुल कुलकर्णींना अशोक पंडित यांनी सुनावलं “आमच्या वेदनेची थट्टा करताय..”; पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या अतुल कुलकर्णींना अशोक पंडित यांनी सुनावलं
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काश्मीरच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम झाला. या हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर...
मुंबई हल्ल्याशी जोडलं गेलं होतं आलिया भट्टच्या भावाचं नाव; 7 वेळा झालीये अटक
या मुस्लिम अभिनेत्याने पाकिस्तानात जाऊन त्यांची बदनामी केली; थेट प्रवेशावर बंदी
प्रेम, वेदना…अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
उन्हाळ्यात सब्जा बिया खाण्याचे 5 सोपे ट्रिक्स, तुमच्या आरोग्याला होईल दुप्पट फायदा
तुमचे तोंड वारंवार कोरडे पडतंय? होऊ शकतात हे 5 गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या
इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर