मराठी भाषेचा मुद्दा पेटला, मराठमोळी अभिनेत्रीला संताप, चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे समोरासमोर

मराठी भाषेचा मुद्दा पेटला, मराठमोळी अभिनेत्रीला संताप, चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे समोरासमोर

मराठी-गुजराती वादावर अभिनेत्री रेणुका शहाणेंनी मराठीची बाजू घेतल्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक पोस्ट करत शहाणेंच्या भूमिकेवर काही प्रश्न केले आहेत. गेल्या आठवड्यात गिरगावातल्या एका नोकरीच्या जाहिरातीत मराठी माणसांनी अर्ज करु नये, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. टीकेनंतर त्याबद्दल जाहिरात देणाऱ्यानं माफी मागितली. त्यानंतर घाटकोपरमध्ये गुजरातीबहुल सोसायटीत ठाकरेंच्या उमेदवारास मराठी म्हणून प्रवेश नाकारला गेल्याचा आरोप केला गेला. यावरून अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मराठी भाषेला कमी लेखणाऱ्या लोकांना मतदान करू नका, असं आवाहन केलं.

काय म्हणाल्या रेणुका शहाणे?

“मराठी “not welcome” म्हणणार्‍या लोकांना, मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे, असं रेणुका शहाणे म्हणाल्या. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना उद्देशून वक्तव्य केलं.

कोव्हिडमध्ये पीपीई किट्स, बॉडी बॅग्स यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लुटून खाल्ले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार?, असं चित्रा वाघ म्हणाल्या. यानंतर यामध्ये अंधारे यांनी उडी घेतली.

चित्रा वाघ यांना लेडी सोमय्या म्हणतं विचारलं की, कोव्हिडमध्ये राजकारण बाजूला ठेवत सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण भाजपचे नेते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये पैसे टाका असे अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते. या पीएम केअर फंड बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असे उघड झाले, त्यावर आपण कधी बोलणार? असा सवाल अंधारे यांनी केला.

चित्रा वाघ यावर म्हणाल्या की कोव्हिडमध्ये बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला पण मुंबई महापालिकेच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना कुलूप लावले. आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतूपुरस्सर मौन बाळगणार का?, असा प्रतिसवाल वाघ यांनी केला. यावर अंधारे यांनीही वाघ यांना प्रश्न केला.

अंधारे म्हणाले की त्याकाळात आयुक्त चहल, खोपकरांवर आरोप करणारे आता चकार शब्द काढत नाहीत. त्याच काळात स्थायी समिती ज्यांच्याकडे होती ते यशवंत जाधव, यामिनी जाधवांवर व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी ढिगाने आरोप केले. त्यांनाचा निवडणुकीत उतरवणारे लोकांना मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो का?, असा प्रश्न अंधारेंनी वाघांना विचारलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलंय...
‘सैराट’मधील इनामदार वाडा आला पाण्याबाहेर, पर्यटकांची गर्दी वाढली; वाड्याबाबतचं रहस्य काय ?
यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाच्या नावाचा अर्थ खूपच खास
श्वेता तिवारी, पलक तिवारी यांचं शिक्षण जाणून व्हाल हैराण, कमावतात कोट्यवधींची माया
मतदान न करणाऱ्यांना ‘अशी’ सभ्य वागणूक द्या; प्राजक्ता माळीच्या पोस्टने लक्ष वेधलं
गोविंदाच्या भाचीचे मोठे विधान, रागिनी थेट म्हणाली, मामाने स्वत:च्या मुलासाठी..
सलमान खानचे आई वडील पोहचले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास फोटो व्हायरल