दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा

दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलंय आणि नागरिकांनाही मतदान करण्याचं आवाहन केलंय. अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा पती रणवीर सिंहसोबत मतदान करण्यासाठी पोहोचली. रणवीर आणि दीपिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचलेल्या दीपिकाच्या बेबी बंपकडेच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत.

फेब्रुवारीत दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित गरोदर असल्याची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने सांगितलं होतं. तर काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा तिचा बेबी बंप न दिसल्याने नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. अखेर त्या प्रश्नांचं उत्तर नेटकऱ्यांना मिळालं आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाचं बेबी बंप स्पष्ट पहायला मिळतंय. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातला होता. गर्दीतून पुढे येताना ती तिच्या पोटावर हात ठेवून स्वत:ला सांभाळताना दिसते. तर रणवीरसुद्धा तिची काळजी घेताना दिसतोय.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिकाच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्रोल करणारी लोकं कुठे गेली? ज्यांना दीपिका गरोदर नाही असं वाटत होतं, असं एकाने लिहिलं. तर ‘आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोक म्हणतील की ती सरोगसीने आई होणार’, असं दुसऱ्याने उपरोधिकरित्या म्हटलंय. ‘दीपिका सरोगसीने आई होणार असं जे म्हणत होते, त्यांना अखेर उत्तर मिळालंय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिका हे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेले होते. त्यावेळी दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ती एका गाडीतून उतरते आणि पुढे दोन गाड्यांमधील कमी जागेतून बिनधास्त चालत पुढे येते. त्यावरून अनेकांनी तिच्या गरोदरपणाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. जर दीपिका प्रेग्नंट आहे तर ती स्वत:ची काळजी का घेत नाहीये, असा सवाल काहींनी केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;