एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा; शरद पवार यांचा इशारा

एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा; शरद पवार यांचा इशारा

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. संघ या विचारांनी मजबूत असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वअध्यक्ष आता त्यांची गरज संपली असे म्हणत असतील तर भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. भाजपला त्यांची गरज संपेल त्या दिवशी त्यांनी संघाबाबत जी भूमिका घेतली तीच या दोन गटांबाबत घेतली जाईल, असे शरद पवार म्हणाले.

भाजपसमोर इंडिया आघाडीचे जबरदस्त आव्हान आहे. इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. त्यातील 15 पक्ष असे आहेत ज्यांचा लोकसभेत एकच सदस्य आहेत. त्यामुळे विचारधारा एक आहे तिथे वेगळा निर्णय कशाला घ्यायचा, त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे मत मांडले होते. वेळ आल्यावर यावर विचार करता येईल, असे याबाबत आपले मत होते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकास्त्र सोडले. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान प्रचंड घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक सभा मोठ्या प्रमाणात घेतल्या. सभा घेऊन ते विकासाबाबत काहीही सांगत नाही, तर व्यक्तिगत हल्ले करतात. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून व्यक्तिगत हल्ले करणे हे योग्य नाही. त्यांनी लोकांची निराशा करण्याचं काम केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;