Lok sabha election 2024 : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच बोगस मतदान
ठाण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज पाचव्या टप्प्यात मतदान सुरु झाले आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत ठाण्यात 14.86 टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया सुरू असून ठाण्यात बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे.
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लाखो मतदार घराबाहेर पडले आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना दुपारी मतदान करण्यासाठी येणारे मतदार निराश झाले. बोगस मतदान झाल्याने भरत बैवा (वय – 38) यांना मतदान करता आले नाही.
दरम्यान, महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बोगस मतदान वर लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पराभवाच्या भीतीने शिवसैनिकांना अटक; पोलीस, निवडणूक आयोगावर भाजपचा दबाव, संजय राऊत यांचा संताप
कुठे झाले बोगस मतदान?
भरत बैवा हे मतदान करण्यासाठी सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रावर गेले असता तुमच्या नावावर आधीच मतदान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने यावर योग्य कारवाई करून बोगस मतदानावर लक्ष दिले पाहिजे अशी मागणी भरत बैवा केली आहे. दरम्यान, मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी भरत बैवा याचे बॅलेट पेपर वर मतदान करून घेतले असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List