गोविंदाच्या भाचीचे मोठे विधान, रागिनी थेट म्हणाली, मामाने स्वत:च्या मुलासाठी..
अभिनेत्री रागिनी खन्ना ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. रागिनी खन्नाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रागिनी खन्ना ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रागिनी खन्ना हिने ससुराल गेंदा फूल यासारख्या हिट मालिकांमध्ये जबरदस्त भूमिका केल्या आहेत. हिट मालिक देऊनही रागिनी खन्ना हिच्या हाताला सध्या काम नाहीये, तिला काम मिळत नाहीये. आता यावरच जाहिरपणे बोलताना रागिनी खन्ना ही दिसलीये. आता रागिनी खन्ना हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
रागिनी खन्ना हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रागिनी खन्ना ही दिसलीये. रागिनी खन्ना ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. रागिनी खन्ना म्हणाली की, मी कधीच मामाच्या नावाचा वापर केला नाहीये. मी जे काही मिळवले आहे, ते फक्त आणि फक्त मेहनतीवरच मिळवले आहे.
रागिनी खन्ना म्हणाली, मला आतापर्यंत जेवढ्या भूमिका मिळाल्या आहेत, त्यासर्व मी ऑडिशन देऊनच मिळवल्या आहेत. मी स्वत:ची एक वेगळी ओळख तयार करण्यासाठी खूप जास्त मेहनत नक्कीच घेतलीये. मुळात म्हणजे चीची मामा हे कोणासाठीच फोन करत नाहीत, त्यांच्या मुलाला एखादी भूमिका द्या म्हणून त्यांनी कधीच फोन केला नाही.
करिअरमध्ये कधीच मामाचे नाव वापरून आपण फायदा करून नाही घेतला हे देखील रागिनी खन्नाने म्हटले. हेच नाही तर मी कधीच कोणाला म्हटले नाही की, मी गोविंदाची भाची आहे आणि मला काम द्या. आजपर्यंत तरी मला मामाचे नाव वापरण्याची गरज नाही पडली. मी खरोखरच यासाठी देवाची आभार मानते.
मी एकदा किंवा दोनदा नाही तर तब्बल 7 ते 8 वेळा ऑडिशन दिले आहेत आणि त्यानंतर मला काम मिळाले आहे. मला हवी तशी भूमिका मिळो किंवा नाही पण मी नेहमीच पुढे गेले आहे. आता रागिनी खन्ना हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. रागिनी खन्ना ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. रागिनी खन्ना हिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List