“दिल्ली सोडा अन्यथा…”, केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; मेट्रोतील फोटो शेअर करत ‘आप’चा भाजपवर आरोप

“दिल्ली सोडा अन्यथा…”, केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; मेट्रोतील फोटो शेअर करत ‘आप’चा भाजपवर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘आप’ने दिल्ली मेट्रोतील फोटो शेअर केले असून केजरीवाल यांचा जीव धोक्यात असल्याचे म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पीएमओ, भाजप आणि नरेंद्र मोदींच्या इशाऱ्याने राजीव चौक, पटेल नगर मेट्रो स्थानकावर धमकीचा संदेश लिहिण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा इशारा ‘आप’ने दिला आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजप सैरभैर झाली आहे. भाजप केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचे षडयंत्र रचत आहे. हे सगळे षडयंत्र पीएमओ कार्यालयातून रचले जात आहे. राजीव चौक आणि पटेल नगर मेट्रो स्थानकावर केजरीवाल यांच्याविरोधात धमकीचे संदेश लिहिण्यात आले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;