दिंडोरी लोकसभेत महायुतीतच वॉर, भुजबळांनी कांदेंना काय दिला सल्ला

दिंडोरी लोकसभेत महायुतीतच वॉर, भुजबळांनी कांदेंना काय दिला सल्ला

Loksabha election : कांदा प्रश्न दिंडोरी लोकसभेत सर्वात मोठा मुद्दा आहे, त्यात कांदे विरुद्ध भुजबळांमध्ये कोण कुणाचं काम करतंय यावरुन वाद रंगलाय. भुजबळ महायुतीत असूनही तुतारीचं काम करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यावर आधीच कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना दुसऱ्या कांदेंनी भाजपची अडचण करु नये, असा सल्ला भुजबळांनी दिला आहे. मात्र सुहास कांदेंच्या आरोपांनंतर उमेदवार भगरेंसोबत भुजबळांचे निकटवर्तीय विनोद शेलारांचे फोटो व्हायरल झाले आहेत. मविआचे उमेदवार भास्कर भगरे मतदारसंघात प्रचारावेळी भेट घेतल्याचा हा फोटो आहे.

भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा

नाशिक लोकसभेतून भुजबळ इच्छूक होते. मात्र शिंदेंच्या शिवसेनेलाच ती जागा मिळाल्यानंतर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे परवाच शिंदेंचे उमेदवार हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर सुहास कांदेंच्या आरोपांनी पुन्हा वाद उभा राहिला आहे.

सुहास कांदे नांदगाव विधानसभेचे आमदार आहेत. तर भुजबळ शेजारच्या येवला विधानसभेचं प्रतिनिधीत्व करतात. याआधीपासूनच दोघंही एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्करराव भगरेंमध्ये लढत होणार आहे.

कोणाचं कुठे वर्चस्व?

दिंडोरीत नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात. 2019 ला भारती पवारांविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले लढले होते. भारती पवार यांना 5,67,470 तर महालेंना 3,68,691 मतं पडली होती. 1,98,779 मतांनी भारती पवार यांचा विजय झाला होता. 5 मतदारसंघांमध्ये भारती पवार यांना लीड होतं. तर महाले यांना दिंडोरीत आघाडी मिळाली होती.

भास्कर भगरे हे पेशानं शिक्षक असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. कांदा-द्राक्षं यासंदर्भात याआधी अनेक आंदोलनंही त्यांनी केली आहेत. यंदा कांद्याचा प्रश्न महत्वाचा बनल्यामुळेच भगरेंना संधी दिल्याचं बोललं जातंय. नेमक्या त्याच मुद्द्यावर बोट ठेवत भुजबळांनी शिंदे गटाच्या सुहास कांदेंना उत्तर दिलं आहे. महायुतीतच वॉर रंगल्याने विरोधक ही त्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा दीपिका गरोदर नाही म्हणणारे कुठे गेले? बेबी बंप पाहून चाहत्यांचा टीकाकारांना टोमणा
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलंय...
‘सैराट’मधील इनामदार वाडा आला पाण्याबाहेर, पर्यटकांची गर्दी वाढली; वाड्याबाबतचं रहस्य काय ?
यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाच्या नावाचा अर्थ खूपच खास
श्वेता तिवारी, पलक तिवारी यांचं शिक्षण जाणून व्हाल हैराण, कमावतात कोट्यवधींची माया
मतदान न करणाऱ्यांना ‘अशी’ सभ्य वागणूक द्या; प्राजक्ता माळीच्या पोस्टने लक्ष वेधलं
गोविंदाच्या भाचीचे मोठे विधान, रागिनी थेट म्हणाली, मामाने स्वत:च्या मुलासाठी..
सलमान खानचे आई वडील पोहचले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास फोटो व्हायरल