लोकशाहीचा ‘पोर’खेळ! भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलानं केलं मतदान, फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

लोकशाहीचा ‘पोर’खेळ! भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलानं केलं मतदान, फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ

गुजरातमधील दाहोद मतदारसंघात येणाऱ्या महिसागर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मुलाने ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही याहून धक्कादायक प्रकार घडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभेसाठीही याच दिवशी मतदान झाले. यादरम्यान एका अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत दिसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांचा मुलगा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे मतदानाचा हा व्हिडीओ मेहर यांनी स्वत:च फेसबुकवर शेअर केला होता, मात्र प्रकरण शेकणार असे दिसताच त्यांनी हा व्हिडीओ डिलीट केला. मात्र तोपर्यंत हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि काँग्रेसने भाजपला घेरले आहे.

काँग्रेसने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून भाजपसह निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते पियूष बबेले यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, भाजपने निवडणूक आयोगाला लहान मुलांचे खेळणे बनवले असून भोपाळमध्ये भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य विनय मेहर यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान करायला लावले. मेहर यांनी याचा व्हिडीओही बनवला आहे. त्यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसवुकवर शेअर केला आहे. यावर कारवाईचा बडगा उचलला जाईल का? असा सवाल काँग्रेस नेत्याने केला आहे.

…तर कारवाई होणार

या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून भोपाळचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी बैरसियाच्या एसडीएमला सदर व्हिडीओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यात दोषी आढळल्यास भाजप नेत्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुलगा हट्ट करत होता!

दरम्यान, सदर प्रकारावर भाजप नेते विनय मेहर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुलगा हट्ट करत होता म्हणून त्याला मतदान केंद्रावर घेऊन गेलो. चुकून व्हिडीओ शूट करून तो फेसबुकवर अपलोड झाला. यामागे माझा काही चुकीचा उद्देश नव्हता, असे मेहर यांनी म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;