तू कुठं जाते तेच पाहतो, पहिल्यांदा कपडे बदल; अभिनेत्रीने केली निर्मात्याची पोलखोल

तू कुठं जाते तेच पाहतो, पहिल्यांदा कपडे बदल; अभिनेत्रीने केली निर्मात्याची पोलखोल

हिंदीतील बहुचर्चित मालिका  ‘ये हैं मोहब्बतें च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या फारच चर्चेत आहे. ‘ये हैं मोहब्बतें या मालिकेनंतर कृष्णाने ‘शुभ शगुन’ या मालिकेत काम केलं. मात्र आता अभिनेत्रीने मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.

दरम्यान कृष्णा मुखर्जीने टेलीटॉक इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर तिने भाष्य केलं आहे. कृष्णा मुखर्जी म्हणाली,”शुभ शगुन’ या मालिकेच्या शूटिंगला मार्च 2022 मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीचा एक महिना सर्वकाही ठीक होतं. पण पुढे निर्मात्याचा व्यवहार आणि वागणूक बदलली. ‘शुभ शगुन’चे निर्माते कुंदन सिंह आहेत. पण तो स्वत:ला गुंड समजतो. शूटिंगच्या काही दिवसांनंतर आम्ही चेक बाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. शूटिंग सुरू होऊन चार महिने झाल्यानंतरही मला चेक मिळाला नाही. तेव्हा मी त्याला काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने सर्व कलाकारांना चेक दिले. मात्र काही दिवसांनी पुन्हा हेच घडलं, असे ती म्हणाली.

कृष्णा पुढे म्हणाली, एक दिवस माझी प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे मी शूटिंग करणार नाही, असं त्याला सांगितलं. त्यावेळी तो माझ्याशी खूप विचित्र वागला होता. तू कुठे जाते तेच पाहतो,पहिल्यांदा कपडे बदल असं कुंदन मला म्हणाला. या गोष्टीचा मला राग आला. मी निर्मात्यासमोर दरवाजा बंद केला आणि कपडे बदलू लागले. मी कपडे बदलत असताना वारंवार निर्माते दरवाजा आपटत होते. त्यावेळी माझ्या मदतीला एक सहकलाकार आली. बाथरुममध्ये जाऊन कपडे बदल असा सल्ला तिने कृष्णाला दिला. त्या सेटवर मी अजिबात सुरक्षित नव्हते” असे तिने या मुलाखती दरम्यान सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;