Akshaya Tritiya 2024 – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला खरेदी करा ‘या’ 10 गोष्टी

Akshaya Tritiya 2024 – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला खरेदी करा ‘या’ 10 गोष्टी

हिंदू धर्मामध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2024). वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा सण साजरा केला जातो. यंदा 10 मे रोजी हा सण आला असून मंगल कार्यांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या या दिवशी सोनं-चांदीसह नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोन्याची खरेदी करण्याला लोकांचे प्राधान्य असते. परंतु यासोबतच अनेक गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता.

सोनं – अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोनं हा धातू संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. या दिवशी सोनं खरेदी केल्याने भाग्य उजळते आणि यश मिळते, असे मानले जाते.

चांदी – सोन्याप्रमाणेच चांदीची खरेदीही शुभ मानले जाते. चांदीची भांडी, नाणी किंवा इतर वस्तू खरेदी केल्याने सौभाग्य आणि समृद्धी येते असे मानले जाते. अनेक जण या दिवशी आपल्या प्रियजनांना चांदीच्या वस्तूही भेट देतात.

रिअल इस्टेट – अक्षय्य तृतीयेला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणेही शुभ मानतात. या दिवशी जमीन, घर खरेदी केल्याने दीर्घकाळ समृद्धी नांदते असे मानले जाते.

शेअर्स – शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीही हा दिवस उत्तम मानले जाते. अनेक लोकं या दिवशी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. या दिवशी केलेली गुंतवणूक दीर्घकाळ चांगला परतावा देते, असे गुंतवणूकदार मानतात.

वीजेवर चालणारी उपकरणं – अक्षय्य तृतीयेला अनेक जण वीजेवर चालणारी उपकरणं खरेदी करण्यास प्राधान्य देतात. स्मार्टफोन, लॅपटॉप यासर घरगुती वापराच्या वस्तुंकडे लोकांची ओढ असते.

सोहळा संस्कृती – अक्षय्य पुण्यसंचयाचा दिवस

वाहन – या दिवशी कार किंवा दुचाकी खरेदी केल्याने समृद्धी मिळते असे मानतात. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला गाडी खरेदीसाठीही मोठी वेटिंग लिस्ट असते.

कृषी उपकरणं – हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश असून अक्षय्य तृतीयेला कृषी उपकरणांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. या दिवशी ट्रॅक्टर किंवा इतर कृषी यंत्रसामग्री खरेदी केल्याने भरघोस उत्पन्न मिळते अशी मान्यता आहे.

कपडे – बरीच लोकं शुभ मुहूर्ताला कपडे खरेदी करतात. पारंपरिक किंवा नवीन कपडे खरेदी केल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते.

मातीचे भांडे – हिंदू धर्मग्रंथानुसार कलशाच्या गाभ्यामध्ये प्रजापिता ब्रह्मा, कंठात महादेव रुद्र आणि मुखात भगवान विष्णू वास करतात. कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते. त्या घरात सुख-समृद्धी आणि शांती सदैव राहते.

पुस्तकं – अक्षय तृतीयेला पुस्तकं खरेदी केल्याने ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. त्यामुळे अनेक लोक या दिवशी पुस्तकांची खरेदी करतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक