मुंबई, ठाणे, रायगड तापणार; पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

मुंबई, ठाणे, रायगड तापणार; पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

राज्यातील आणि देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवडाभर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पारा घसरला होता. आता पुन्हा शनिवारपासून वातावरण तापायला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातल्या तीन जिल्ह्यात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये 27 आणि 28 एप्रिल रोजी तापमानात मोठी वाढ होऊ शकते. याआधी 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये अनेक ठिकानी तापमानामध्ये वाढ झाली होती. नवी मुंबईसह, उपनगरात पारा 41 अंशावर गेला होता. आता पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, रायगड या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तापमानात वाढ होणार आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आठवडाभर विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. आता सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड परभणी, हिंगोली या भागात पावसाची शक्यता आहे. पुणे, नगर, जालना, जळगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक