भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत यांची घणाघाती टीका

भाजप चोर आणि लफंग्यांचा पक्ष तर मोदी चोरांचे सरदार! संजय राऊत यांची घणाघाती टीका

जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जातो, पण असे काहीच नाही. भाजपच्या लोकांनी येथील जनतेला फसवून विजय मिळवला आहे. भाजप हा पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे तर मोदी चोरांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार आणि रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत हे जळगावमध्ये आले होते. त्यानंतर संजय राऊत बोलत होते. ते म्हणाले, जळगाव आणि रावेरमध्ये भाजपला गाडण्याची हिंमत इकडच्या जनतेमध्ये आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्रावर भाजपने जो अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.

घोटाळे लपवण्यासाठी अजित पवार भाजपबरोबर!

अजित पवार यांनी शिखर बँक घोटाळय़ासाठीच भाजपसोबत पलायन केले आहे. भाजपचे वॉशिंग मशीन त्यासाठीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ावर भाष्य केले. ते शिखर बँकेच्या घोटाळय़ावरही बोलले. पण आता भाजप सरकारने याच घोटाळय़ांप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देत असेल तर या देशाचे पंतप्रधान किती खोटे बोलतात हे स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले.

 

गद्दारांना जळगाव, रावेरमधून तडीपार करा!

मोदी म्हणतात आम्ही 400 जागा जिंकणार आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले 400 पार नाही तर या वेळेला तडीपार. जळगाव व रावेरच्या जनतेने आता इकडच्या गद्दारांना तडीपार केले पाहिजे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सामान्य माणसांसाठी. हा महाराष्ट्र टिकला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. नरेंद्र मोदी व अमित शहा यांना आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे, असे राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका
देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा...
अब तो अपना राज है, डरने की क्या बात…, अमिताभ बच्चन यांनी हटके स्टाईलमध्ये केलं मतदान करण्याचं आवाहन
Sambhaji Raje : जातीच्या मुद्यावरुन पाडापाडीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? Video
भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने बजावला मतदानाचा हक्क, ‘उमेदवाराला मतदान करताना…’
मतदान सुरु होण्यापूर्वीच अनिल अंबानी मतदानासाठी रांगेत, व्हिडिओ आला समोर
बड्या बिल्डरच्या मुलाच्या पॉश कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
सांगली रेल्वेस्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ताब्यात, फलटणच्या तरुणाला मुंबईतून केली अटक