Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात

लोकसभा निवडणूक : शिवाजीराव आढळराव पाटील यांचा भेटी-गाठींवर भर

Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्या प्रचाराला नागरिकांनी देखील मोठी प्रतिसाद दिला. 

यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे,  आमदार योगेश टिळेकर, पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, मनसे नेते बाबू वागस्कर, नगरसेविका नंदा लोणकर, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, भाजप सरचिटणीस गणेश घुले, मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, हडपसर कार्याध्यक्षा स्मिता दातीर बडदे, ओबीसी सेल हडपसर अध्यक्षा मोनिकाताई काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संजय लोणकर, मयुवक अध्यक्ष राकेश कामठे, वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मोहन क्षिरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यातच हडपसर दौऱ्यावर असता आढळरावांनी पिंगळे वस्ती मुंढवा येथील अखिल गणेश बाग मि६ मंडळाला भेट दिली. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब कोदरे उर्फ सदानंद कोदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर जनसेवा बॅंकेचे संचालक विनायक गायकवाड यांनी मुंढवाचा कायम आपल्या उमेदवाराला असलेल्या पाठिंब्याची पुनरावृत्ती करत घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे त्यांनी आव्हान केले. 

दरम्यान, यावेळी आढळरावांनी कौसरबाग कोंढवा, अरेबियन बाईट्स येथील अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयालाही भेट दिली. त्याचबरोबर बीटी कवडे रोड, प्रभाग क्रमांक २१ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधना बँक चेअरमन चंद्रकांत नारायण कवडे व नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या निवासस्थानी देखील आढळरावांनी सदिच्छा भेट दिली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार...
‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?
जेंव्हा सावत्र बहीण ईशाच्या लग्नाला नव्हते पोहचले सनी आणि बॉबी देओल, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात थेट..
मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
नवरा मारून टाकेल या भीतीने अभिनेत्री करायची असं काम, पती आहे प्रसिद्ध उद्योजक
मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
श्वेता तिवारी हिचे 2 घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, ऑनसक्रिन जावयासोबत अफेअरच्या चर्चा आणि बरंच काही…