मायावतींकडून आकाश आनंद यांची पक्षाच्या वारसदार पदावरून हकालपट्टी

मायावतींकडून आकाश आनंद यांची पक्षाच्या वारसदार पदावरून हकालपट्टी

बसपा प्रमुख मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंद हे आपला राजकीय वारसदार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता आपल्या निर्णयाला त्यांनी मागे घेतलं असून आकाश आनंद यांची महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी मायावती यांनी आकाश आनंद यांना बसपाचा राष्ट्रीय समन्वयक आणि आपला राजकीय वारसदार म्हणून नेमलं होतं.

मायावती यांनीच आपल्या एक्स पोस्टवरून ही माहिती दिली आहे. बसपाची प्रमुख ध्येयधोरणं लक्षात घेऊन पुढची पिढी घडवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बसपाचं व्यापक हित लक्षात घेता आकाश आनंद हे पुरेसे परिपक्व नाहीत, त्यामुळे त्यांना तेवढी परिपक्वता येईपर्यंत दोन्ही महत्त्वाच्या पदांवरून पदच्युत केलं जात आहे, असं मायावती आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.

आकाश आनंद यांचे वडील मात्र पूर्वीप्रमाणेच पक्षाचं काम सांभाळतील, असंही मायावती यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;