उन्हाच्या रेड सिग्नलवर ‘ग्रीन शेड’चा थंडावा

उन्हाच्या रेड सिग्नलवर ‘ग्रीन शेड’चा थंडावा

उन्हाची काहिली वाढली आहे. पारा चढत आहे. घराबाहेर पडणेही अवघड झालंय. भर दुपारी तर परिस्थिती फारच बिकट आहे. अशावेळी कुणी तुमच्या डोक्यावर सावली धरली तर… पुद्दुचेरी येथे खरंच असा प्रकार घडलाय. पुद्दुचेरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उष्णतेचा वाढता प्रकोप पाहून प्रत्येक ट्रफिक सिग्नलजवळ लांबलचक हिरव्या शेड्स लावल्या आहेत. भर उनात ग्रीन सिग्नलची वाट बघत उभ्या राहणाऱयांना प्रवाशांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. याचा व्हिडियो एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. कडक उनात डोक्यावर शेड असल्याने शांतपणे ट्रफिक सिग्नल सुटण्याची वाट पाहणारे बाईकस्वार या व्हिडियोत दिसत आहेत. यावर नेटीजन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;