‘मिस यूएसए’ने मुकुट उतरवला
2023 साली ‘मिस युएसए’ चा मुकूट 24 वर्षीय नोएलिया वोईगट हिने जिंकला होता. मात्र नोएलियाने आता हा मुकुट उतरवण्याचा निर्णय घेतलाय. मानसिक स्वास्थाचे कारण देत तिने आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. नोएलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून आपला निर्णय जाहीर केला. तिने लिहिलंय, मला माहीत आहे की अनेकांसाठी हा मोठा धक्का असू शकतो. ‘मिस युएसए’चा माझा प्रवास अविश्वसनीय आणि खूप सुंदर राहिला. मात्र हा किताब सोडण्याचा खूप कठीण निर्णय मी घेतलाय. आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थाकडे कधी दुर्लक्ष करू नका. आरोग्य ही आपली संपत्ती आहे. माझ्यासाठी एका नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List