ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी विरोधी पक्षनेता दानवे यांना खंडणी मागणार्‍या जवानाला पकडले

ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी विरोधी पक्षनेता दानवे यांना खंडणी मागणार्‍या जवानाला पकडले

देशाच्या संरक्षण दलात असलेल्या एका जवानाने लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनला चीप बसवून हॅक करून तुमचे उमेदवार निवडून देतो असा दावा केला. त्यासाठी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्याशी वारंवार संपर्क करून अडीच कोटी रुपयांची मागणी केली. या जवानाला आज मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख रुपये घेताना एका हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडण्यात यश आले असून, त्याच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथर्डी (जि.नगर) तालुक्यातील काटेवाडी, पो. खरवंडी कासारा येथील मारुती नाथा ढाकणे (42) हा भारतीय सैन्य दलात हवालदार म्हणून उदमपूर, जम्मू- कश्मीर येथे कार्यरत आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून मी आर्मीत मेजर आहे, असे सांगून निवडणूक प्रक्रियेत नियोजनासाठी आपल्याला मदत करतो असे सांगत होता. या निवडणुकीच्या नियोजनासाठी वारंवार भेटण्याची मागणी करत होता. विरोधी पक्षनेता दानवे यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने ईव्हीएम मशीनला चीप लावून आपले उमेदवार निवडणुकीत विजयी करून देतो असे सांगितले. त्याचे वारंवार कॉल येत असल्याने त्यांनी विरोधी पक्षनेता दानवे यांनी याबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना कळविले होते.

दरम्यान, मारुती ढाकणे याने उमेदवार निवडून देण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने आज मंगळवारी सापळा रचण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल न्यू मॉडर्न टी हाऊस स्विट अ‍ॅण्ड स्नॅक्समध्ये साध्या वेशातील पोलीस आणि विरोधी पक्षनेता दानवे यांचे भाऊ शहरप्रमुख राजेंद्र दानवे मारुती ढाकणे याला भेटण्यासाठी गेले. यावेळी उमेदवार विजयी करण्यासाठी अडीच कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. तडजोडीअंती दीड कोटी रुपयांमध्ये सौदा ठरला. ठरल्याप्रमाणे १ लाख रुपये देण्याचे ठरले. हे लाख रुपये मारुती ढाकणे याला देताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा मारून रोकडसह ढाकणे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

55 दिवसांच्या सुटीवर आला होता घरी….

मारुती ढाकणे हा सैन्य दलात जम्मू येथे कार्यरत आहे. तो सध्या 55 दिवसांच्या सुटीवर घरी आला होता. ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीत उमेदवार विजयी करून देण्याचे आमिष दाखवीत फसवणूक करत होता. दोन दिवसांत त्याची सुटी संपणार असल्याने त्याने रक्कम घेऊन सौदा पक्का करण्याचे ठरविले होते. मात्र, तो पोलिसांच्या सापळ्यात आडकला आहे. ढाकणे याने आणखीन किती लोकांची फसवणूक केली हे आता पोलीस तपासातच समोर येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;