Category
Mahayuti
पुणे  राजकीय 

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल!

`महायुती’च्या उमेदवारांच्या पथ्यावर शरद पवारांचा सेल्फ गोल! राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाचे नेते शरद पवार  यांनी वादग्रस्त विधान करून सेल्फ गोल मारून घेतला आहे. या निवडणुकीनंतर छोटे-छोटे पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, या त्यांच्या निवेदनानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा मानला जात आहे की शरद पवार यांचा गट हा तर कॉंग्रेसमध्ये जाईलच पण जाताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटालाही घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचे उमेदवार मात्र खुश झाले आहेत.  
Read More...
पुणे  राजकीय 

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद

“भविष्यात निवडणूक लढेल की नाही, पण यावेळेला एक संधी द्या”, आढळराव पाटलांकडून मतदारांना भावनिक साद महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत. अशातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. भविष्यात निवडणूक लढेल की नाही, सांगता येत नाही. परंतु यावेळी मला काम करण्याची संधी द्या. जी कामे अपुर्ण राहिली आहे. ती पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद द्या. असे आढळरावांनी एका सभेत म्हटलंय.
Read More...
पुणे  राजकीय 

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र

अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संघटनेकडून आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.
Read More...
पुणे  राजकीय 

“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन

“तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर..,’आढळरावांचं मतदारांना आवाहन शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.
Read More...
पुणे  राजकीय 

रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस!

रुग्णालयातील दिलीप वळसे-पाटील यांची शिवाजीराव आढळराव पाटलांकडून विचारपूस! शिरूरमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात लोकसभेची निवडणुक होत आहे. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांनी आपला प्रचार धडक्यात सुरू केला आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे देखील चांगलचे सक्रीय झाले आहेत. अशातच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आढळराव पाटलांनी भेट घेऊन तब्येची विचारपुर केली आहे. काही दिवसांपुर्वी वळसे पाटलांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांची आढळराव पाटलांनी भेट घेतली आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

विद्यमान खासदारांविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश : हडपसरमध्ये आढळरावांचा हल्लाबोल

विद्यमान खासदारांविरुद्ध जनतेच्या मनात आक्रोश : हडपसरमध्ये आढळरावांचा हल्लाबोल मागील पाच वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला.  विद्यमान खासदार  मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली. 
Read More...
पुणे  राजकीय 

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
Read More...
पुणे  राजकीय 

नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील

नरेंद्र मोदींच्या सर्व योजना कौतुकास्पद व जनसामान्यांना दिलासा देणाऱ्या : शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भोसरी दौरा दरम्यान चिखली येथे आयोजित नमो संवाद सभेला उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी गाथा काँलनी, अभंग विश्व फेज सोसायटी, मिरर आरकेड, गव्हाणे आंगण, ग्लोरिया, साई मांगल्य, हरि प्रिया हाईट्स येथिल सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More...
पुणे  राजकीय 

'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील

'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच  मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय. 
Read More...
पुणे  राजकीय 

'तुम्ही लोकांशी गद्दारी केली, त्यामुळें तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका'; आढळराव पाटील यांच्या अमोल कोल्हे यांना टोला

'तुम्ही लोकांशी गद्दारी केली, त्यामुळें तुम्ही निष्ठेच्या गोष्टी सांगूच नका'; आढळराव पाटील यांच्या अमोल कोल्हे यांना टोला शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात आरोप प्रयत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडत असल्याचे दिसते.  निष्ठेच्या व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात स्वतःच्या कोल्हेमळा रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवता आला नाही, त्यासाठी मी २५ कोटी रूपये मिळवून दिले. अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना चांगलेच सुनावले.
Read More...
पुणे  राजकीय 

मंचरच्या ग्रामस्थांचा आढळरावांना पाठिंबा, मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार

मंचरच्या ग्रामस्थांचा आढळरावांना पाठिंबा, मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत मंचर शहरातील विविध राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव, शेतकरी इत्यादींनी आढळराव पाटील यांना पाठिंबा देऊन मताधिक्क्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद! लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे.
Read More...

Advertisement